
नगर- संगमनेरमधील वादग्रस्त प्रकरणात आता गुन्हा दाखल झाला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. वाहनांचे नुकसान करून विखे समर्थकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे यासह 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. आचारसंहिता भंग करत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यांच्यावर गुन्हे दाखल..
खासदार भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. जयश्री थोरात, दुर्गाताई तांबे, डॉ. सुधिर तांबे, उत्कषा रुपवते, इंद्रजित थोरात, शरयु थोरात, सुरेश थोरात, प्रभावती घोगरे, करण ससाणे, बाबा ओहळ यांच्यासह 50 जणांवर संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
वसंत देशमुखांचे वादग्रस्त वक्तव्य…
वसंत देशमुख यांनी जयश्री यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या घटनेनंतर थोरात समर्थकांनी विखे समर्थकांच्या गाड्यांची तोडफोड करून वाहन पेटवले होते. विखे समर्थकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी थोरात समर्थकांनी शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत संगमनेर तालुका पोलिस ठाण्याबाहेर आठ तास ठिय्या दिला होता.
सुजय विखे यांना संगमनेर तालुका बंदींचा ठराव..
सुसंस्कृत राजकारणाची राज्याला दिशा देणाऱ्या संगमनेर तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुजय विखे यांनी सभा घेऊन भडक वक्तव्य केली. यातूनच काही लोकांना प्रोत्साहन मिळाल्याने युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह महिला भगिनींविरुद्ध अत्यंत गलिच्छ भाषेत वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुख व सुजय विखे यांना तातडीने अटक करा या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. तसेच सुजय विखे यांना संगमनेर तालुका प्रवेश बंदी करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला.
