गौरव पोंक्षे/माखजन- सर्वांचे लक्ष लागलेल्या चिपळूण संगमेश्वर विधानसभेची निवडणूक निकाल लागेपर्यंत लक्षवेधी ठरली.आमदार शेखर निकम यांना धामापूर जिल्हा परिषद गटातून मिळालेल्या ३७२५ इतक्या गेम चेंजर मताधिक्यामुळे विजय सुकर झाला.
ह्या जिल्हा परिषद गटात मताधिक्य मिळालेच नसते तर शेखर निकम यांचा विजय केवळ अशक्य होता.पण येथील कार्यकर्त्यानी घेतलेल्या अविश्रांत मेहनती मुळे शेखर निकम यांना निर्णायक आघाडी मिळू शकली.
मतमोजणी च्या वेळी चिपळूण तालुक्यात प्रशांत यादव याना चांगले मताधिक्य मिळाले होते.परंतु संगमेश्वर तालुक्यात धामापूर तर्फे संगमेश्वर जिल्हा परिषद गटात मोठ्या फरकाने शेखर निकम याना आघाडी मिळाल्याने विजयावर शिक्कामोर्तब झाले.
या जिल्हा परिषद गटात एकूण १८ गावे येतात.एका जिल्हा परिषद गटात २ पंचायत समिती गणांचा समावेश आहे.
या जिल्हा परिषद गटात युवक राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष सुशील भायजे,गणपत चव्हाण , मयू बाष्टे, शशिकांत घाणेकर, नाना कांगणे, निलेश भुवड,अक्षय चव्हाण,शेखर उकार्डे,मंगेश मांडवकर, सुरेश लक्ष्मण घडशी,कृष्णा जोगळे, वैभव मते,उमेश महाडिक,संतोष गोटेकर, बावा जड्यार,भाई किंजळकर,प्रिया सुवरे,श्रीमती अंकिता चव्हाण,शीतल दिंडे,लवू सुर्वे,सुरेश रामाणे, प्रशांत रानडे,अमित माचीवले, निलेश भोजने,एम आर कांबळे, दीपक जाधव, अमोल नेटके,समीर लोटणकर, सुबोध चव्हाण आदींसह सर्वच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली
शेखर निकम निवडून आल्यावर सर्व कार्यकर्त्यानी जल्लोष करत ,विजयी मिरवणूका काढल्या.धामापूर जिल्हा परिषद गटातून चुरशीच्या लढाईत मोठे मताधिक्य मिळाल्याने शेखर निकम यांनी मतदारांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले