दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी वरदान ठरणार “सक्षम ॲप”..

Spread the love

आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने “सक्षम” नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे.

या ॲपवर दिव्यांग व जेष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधेचा सर्व गरजू मतदारांनी आपल्या मोबाईल मध्ये सक्षम ECI ॲप डाऊनलोड करून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

दिव्यांग (PWDs) मतदारांकरिता आयोगाने तयार केलेले सक्षम ॲपवर विविध सुविधा दिल्या आहेत. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्व प्रथम दिव्यांग मतदारांनी आपल्या मोबाईलमध्ये सक्षम ॲप डाऊनलोड करून घ्यावे.

निवडणूक संदर्भात सेवा घेण्याकरिता दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक इ. माहिती ॲप मध्ये भरावी. दिव्यांग व वयोवृद्ध जेष्ठ नागरिकांना या सक्षम ॲपद्वारे मतदानाच्या दिवशी मतदानासाठी लागणाऱ्या सहाय्यतेची मागणी नोंदविता येईल, त्याद्वारे मतदारसंघातील दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना त्यांच्या मतदानाचे मतदार संघ व स्थाननिश्चिती यंत्रणेला करणे शक्य होईल. या ॲपद्वारे नोंदणी झाल्यानंतर दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर, सहाय्यक, मदतनीस इ.प्रकारची सुविधा या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहेत.

सक्षम ॲप मध्ये अनेक सुविधा प्रदान करण्यात आलेल्या आहेत. या ॲपमध्ये मोठे फॉन्ट आणि उच्च कॉन्ट्रास्ट रंग असल्यामुळे दिव्यांगासाठी वापर करणे सोपे होईल. यामध्ये मतदान केंद्राबद्दल माहिती उपलब्ध असून ज्यामध्ये आपले मतदान केंद्राचे स्थान, मतदान केंद्र, उपलब्ध प्रवेश योग्यता आणि अधिकारी संपर्क या तपशिलाचा समावेश आहे. दिव्यांगांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होताना येणाऱ्या कोणत्याही समस्येबद्दल ॲप वर तक्रार नोंदविता येणार आहे.

दिव्यांगांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सक्षम ॲप हे महत्वाचे असून हे ॲप वापरण्यास अतिशय सोपे आहे. ज्यामुळे दिव्यांगांना व जेष्ठ नागरिकांना मतदान करण्यासाठी नोंदणी करणे, त्याचे मतदान केंद्र शोधणे आणि त्यांचे मत देणे सोपे होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्ती व वयोवृद्ध नागरिकांनी सक्षम ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून यामध्ये आवश्यक असणाऱ्या सुविधांचा लाभ घ्यावा. हे ॲप खऱ्या अर्थाने दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे, यात शंकाच नाही

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page