गेली तीन वर्ष साकारत आहे विविध समाज माध्यमांच्या विषयावर भाष्य करणारे देखावे….
संगमेश्वर प्रतिनिधी- नावडी येथील युवा कार्यकर्ता कु. साहिल सुनिल आंबवकर (Msc) याने गेले तीन वर्ष घरगुती गणेशोत्सव सजावटीमध्ये विविध आकर्षक देखावे साकारलेले आहेत…*
सन २०२२ मध्ये गणेशोत्सवमध्ये त्याने विठाई बस त्यानंतर सन २०२३ मध्ये जेजुरी मंदिर अशी सजावट केली होती. यंदाच्या वर्षी आपल्या महान भारत देशाला T-20 वर्ल्डकप मिळाला असल्यामुळे कु. साहिल आंबवकर याने आपल्या महान भारत देशाचा अभिमान मनाशी बाळगून तसेच राष्ट्रीय खेळाडूंची मेहनत व खेळाबद्दलचे प्रेम या दुहेरी संगमाने गणेशोत्सवाचे औचित्य साधून या संगमेश्वरच्या युवा कार्यकर्त्याने आपल्या शिक्षणाबरोबर हि कला जोपासली आहे. यंदा अमेरिकेतील बार्बाडॉस स्टेडियम त्याने आकर्षित पद्धतीने व विविध कल्पकतेने साकारलेले आहे.
बार्बाडोस क्रिकेट स्टेडियम ची प्रतिकृती तयार करताना त्याचा मित्र सुशांत भोसले ह्याची मोलाची साथ मिळाली त्याने मला वेगवेगळ्या डिझाईन तयार करून दिल्या तसेच त्याचा मित्र चिंतन घडशी आणि त्याची मैत्रीण धनश्री यांच्याशी संवाद साधून व त्यांचे सहकार्य मिळवून त्याने या देखाव्याच्या निमित्ताने मेहनत घेऊन हा देखावा साकारला आहे व देशाचा अभिमान राखण्याचा प्रयत्न केला आहे.
संगमेश्वरमधील पदाधिकारी, विविध सामाजिक कार्यकर्ते व भाविकांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने हा देखावा पाहण्यासाठी गर्दी केली होती.