धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध…

Spread the love

रत्नागिरी दि. 17 मार्च 2024 : सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय / संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक. 06.06.2024 पर्यंत) निर्बंध घालण्यात येत असल्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी लागू केले आहेत.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कार्यक्रम दिनांक 16 मार्च रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांका पासून आदर्श आचार संहिता अंमलात आल्याने रत्नागिरी जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हादंडाधिकारी / उपविभागीय दंडाधिकारी/तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निबंध घालणे आवश्यक असल्याने तसेच सर्व संबंधीतांना नोटीस देवून त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी श्री. सिंह, यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय / संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक. 06.06.2024 पर्यंत) निर्बंध घालीत असल्याचा आदेश दिला..

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page