कान दुखणे – Ear pain :

Spread the love

कान दुखणे हा त्रास सर्वानाच कधीनाकधी होत असतो. विशेषतः लहान मुलांमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात दिसून येतो. अनेक कारणांमुळे कान दुखत असतात. यामध्ये प्रामुख्याने कानात झालेल्या इन्फेक्शनमुळे कान दुखत असतात. याशिवाय सर्दी झाल्यामुळे तसेच कानात मळ अधिक झाल्यानेही कान दुखू लागतो. यासाठी कान दुखणे याची कारणे व त्यावरील घरगुती उपाय तसेच औषध उपचारांची माहिती डॉ सतीश उपळकर यांनी या लेखात दिली आहे.

कान दुखणे याची कारणे –

कानात बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळे,
सर्दी झाल्याने सायनस इंन्फेकशनमुळे,
हिरड्या सुजल्यामुळे,
कानात मळ अधिक झाल्याने,
कानाचा पडदा फाटल्यामुळे,
कानात काडी अथवा टोकदार वस्तू घालून जखम झाल्यामुळे,
कानात इंज्यूरी किंवा मार लागल्याने कान दुखत असतो. वरीलपैकी कारणे ही कान दुखणे यासाठी कारणीभूत ठरू शकतात.

कान दुखणे यावरील घरगुती उपाय –

लसूण –

दोन ते तीन लसूण पाकळ्या बारीक करून मोहरीच्या तेलात गरम कराव्यात. थंड झाल्यावर तेल गाळून घ्यावे. ह्या तेलाचे 2-3 ड्रॉप्स दुखणाऱ्या कानात घालावे. यामुळे कान दुखणे थांबण्यास मदत होईल. याशिवाय आपण लसूण रसाचे काही थेंबही दुखणाऱ्या कानात घालू शकता.

कांदा –

कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुण असतात. कांदा थोडा गरम करून त्याचा चमचाभर रस काढावा. या रसाचे 2 ते 3 ड्रॉप्स कानात दिवसातून 3 वेळा घातल्यास कान दुखणे कमी होते.

आले –

कांदा आणि लसूण प्रमाणेच आलेही कान दुखणे यावर उपयोगी ठरते. आल्याच्या रसाचे 2 ते 3 ड्रॉप्स कानात दिवसातून 3 वेळा घातल्यास कान दुखणे दूर होते. हा आयुर्वेदिक उपाय कान दुखणे यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण आल्यामध्ये वेदना व सूज कमी करणारे आयुर्वेदिक गुणधर्म असतात.

तुळशीची पाने –
तुळशीच्या पानांचा रस काढून त्याचे काही थेंब दिवसातून 2 वेळा कानात टाकावे. हा घरगुती उपाय केल्यामुळेही कान दुखणे थांबते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page