भारतीय जनता पार्टी कोकणचे नेते रविंद्र चव्हाणच कोकणातले किंगमेकर! कोकणातून शिवसेनेचा केला सुपडा साप…

Spread the love

मुंबई- महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीने महायुतीला धोबी पछाड दिल्याचे दिसत असताना कोकण पट्ट्यात मात्र महायुतीला मतदारांनी कौल दिल्याचं स्पष्ट झालं. महायुतीतर्फे विशेषतः भारतीय जनता पार्टीतर्फे कोकणची धुरा सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या खांद्यावर होती. चव्हाण यांच्याच अचूक नियोजनाच्या आणि अत्यंत आक्रमक पद्धतीने निवडणुका लढविण्याच्या कौशल्याने रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे कल्याण पालघर पट्ट्यात महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला.

रविंद्र चव्हाण कायम कार्यकर्त्यांच्यात मिळून मिसळून वागणारे नेते आहेत. दिवसातल्या कुठल्याही वेळेला थेट संपर्क साधता येणारे नेते असा त्यांचा नावलौकिक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि सावरकरांच्या विचारधारेशी प्रामाणिक असलेला आपण एक कार्यकर्ता आहोत असा ते नेहेमी उल्लेख करतात आणि ते करत असताना भाजपा पक्षवाढीसाठी, मतदानाचा टक्का वाढण्यासाठी, विरोधकांची मते आणि मने वळविण्यासाठी साम दाम दंड भेद अशा सर्व पद्धती वापरण्यात चव्हाण यांचा हातखंडा आहे. तळ कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग पासून उत्तरेला दुसऱ्या टोकाला असलेल्या पालघरपर्यंत रविंद्र चव्हाण यांनी तळ ठोकून पक्षाच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी केलेल्या मतांच्या नियोजनामुळे आणि विरोधी मतांच्या विभाजनाच्या क्लुप्त्यांमुळे महायुतीला ५-० असे निर्भेळ यश पाहायला मिळत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page