‘उडान’ योजनेअंतर्गत रत्नागिरीकरांचे विमान प्रवासाचे स्वप्न लवकरच साकारणार!…

Spread the love

रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यातील येथील विमानतळावर रविवारी सायंकाळी ‘नाईट लँडिंग’ची चाचणी घेण्यात आली. रत्नागिरी विमानतळावर आतापर्यंत फक्त दिवसात विमान उतरू शकेल, अशी सुविधा होती. मात्र, आता नाईट लँडिंगची चाचणी झाल्याने रत्नागिरीवासियांचे विमान प्रवासाचे स्वप्न लवकरच साकारणार आहे.

भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यात असलेल्या या विमानतळावरून आतापर्यंत केवळ तटरक्षक दलाची हेलिकॉप्टर्स तसेच व्हीआयपींसाठीची छोटी विमाने तीही दिवसा उतरतील, अशी सुविधा होती. मात्र आता नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे रत्नागिरीकरांचे विमानातून प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकणार आहे.

रविवारी सायंकाळी उशिराने पहिल्यांदाच तटरक्षक दलाच्या विमानाचे ‘नाईट लँडिंग’ झाले. रात्रीच्या वेळी लँडिंग आणि टेकऑफ अशा दोन्ही प्रकारच्या चाचण्यांमुळे रात्री नऊ वाजेपर्यंत रत्नागिरीच्या आकाशात चाचणीसाठीचे विमान घिरट्या घालताना दिसत होते.

केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत रत्नागिरीतून लवकरच विमान जगावणार आहे. येथील धावपट्टीचे उर्वरित काम पूर्ण झाल्यामुळे नाईट लँडिंग च्या सुविधांची कामे पूर्ण केल्याने रविवारी सायंकाळी तटरक्षक दलाच्या विमानाने पहिले यशस्वी नाईट लँडिंग केले, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

८० सीटर विमाने येथील विमानतळावर उतरू किंवा उड्डाण घेऊ शकतील, अशी येथील धावपट्टीची रचना करण्यात आली आहे. रत्नागिरी विमानतळ हे तटरक्षक दलाच्या ताब्यात असल्यामुळे येथील धावपट्टी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तटरक्षक दलाकरता कोणत्या क्षणी उपलब्ध राहण्याच्या दृष्टीने या ठिकाणी उतरलेले नागरी सेवेतील विमान पार्किंगला नेऊन ठेवता येईल, अशी येथील विमानतळाची रचना करण्यात आली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page