मुंबई : रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांना उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्काराने मुंबईत झालेल्या कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सन 2023-24 या वर्षात निवडणूक विषयक कामकाजामध्ये केलेल्या उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यादीमध्ये ॓ उत्कृष्ट मतदार जनजागृती पुरस्कार 2024॔ हा पुरस्कार रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह प्रदान करण्यात आला.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी रत्नागिरी श्री राहुल गायकवाड आणि 266 रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी श्री जीवन देसाई यांनाही मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते मुंबई येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला.