कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 25 जानेवारी 2024 च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.
▪️मेष :
आज चंद्र 25 जानेवारी, 2024 गुरूवार च्या दिवशी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपण अधिक हळवे व भावनाशील होण्याची शक्यता असल्याने आपणास सावध राहावे लागेल. आज लहान -सहान गोष्टींनी आपल्या मनास ठेच लागून मन दुःखी होईल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. संपत्ती विषयक कोणतेही काम करायला आजचा दिवस प्रतिकूल आहे. आपला स्वाभिमान दुखावला जाणार नाही ह्याची दक्षता घ्यावी लागेल. एखाद्या स्त्रीमुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस मानसिक ताण तणावाचा आहे.
▪️वृषभ :
आज चंद्र 25 जानेवारी 2024 गुरूवार च्या दिवशी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपल्या चिंता दूर होऊन आपल्या उत्साहात वाढ होईल. मन आनंदी राहील. जास्त भावूक व हळवे व्हाल. आपली कल्पनाशक्ती विकसित होईल. त्यामुळे सृजनशील साहित्य रचना करू शकाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. कुटुंबीय व विशेषतः आईशी भावबंध वृद्धिंगत होईल. प्रवासाचे बेत आखाल. कौटुंबिक व आर्थिक बाबींवर जादा लक्ष द्यावे लागेल.
▪️मिथुन :
आज चंद्र 25 जानेवारी, 2024 गुरूवार च्या दिवशी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज थकवा, कार्यमग्नता व प्रसन्नता ह्यांचा संमिश्र अनुभव येईल. निर्धारित कामे पूर्ण करू शकाल. धनप्राप्तीची योजना बारगळेल असे आधी वाटले तरीही नंतर त्यात यश मिळेल. मित्र व हितचिंतकांचा सहवास घडेल. व्यवसायात उत्साह व प्रसन्नता वाढेल. सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल.
▪️कर्क :
आज चंद्र 25 जानेवारी, 2024 गुरूवार च्या दिवशी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस सर्व दृष्टीने आनंददायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया स्वस्थ व आनंदी राहाल. आप्तेष्ट व कुटुंबीयां कडून सौख्य व आनंद ह्यांची प्राप्ती होईल. तसेच त्यांच्या कडून काही भेटवस्तू मिळतील. प्रवास व खाण्या – पिण्याचे चांगले बेत आखाल. प्रवास आनंददायी होईल. पत्नी कडून एखादी आनंददायी बातमी मिळेल. वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान मिळेल. मन जास्त संवेदनशील होईल.
▪️सिंह :
आज चंद्र 25 जानेवारी, 2024 गुरूवार च्या दिवशी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपणास आपल्या संवेदनशीलतेवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. शक्यतो निरर्थक वाद टाळा. कोर्ट- कचेरीतील कामे जपून करा. विदेशातून काही बातमी येईल. संयमित राहा. स्त्रीयांशी सावधपणे व्यवहार करा. आज खर्चात वाढ होईल.
▪️कन्या :
आज चंद्र 25 जानेवारी, 2024 गुरूवार च्या दिवशी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील. धन प्राप्ती होईल. मित्र – मैत्रिणीं कडून काही लाभ संभवतात. प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे मन आनंदित होईल. व्यापारात धन वृद्धी संभवते. रम्यस्थळ किंवा जलाशयाच्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत ठरवाल. संतती विषयक आनंददायी बातमी मिळेल. वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभेल. कार्यालयीन कामा निमित्त प्रवासाचे बेत आखाल. घरात सामंजस्याचे वातावरण राहील.
▪️तूळ :
आज चंद्र 25 जानेवारी, 2024 गुरूवार च्या दिवशी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात व कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. नोकरीत बढतीची संधी लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंद व उत्साहाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. माते कडून लाभ संभवतो. वैवाहिक सुखाचा आनंद उपभोगू शकाल. सहकारी चांगले सहकार्य करतील. शासकीय कार्यांत यशस्वी व्हाल.
▪️वृश्चिक :
आज चंद्र 25 जानेवारी, 2024 गुरूवार च्या दिवशी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज शारीरिक थकवा, आळस व मानसिक चिंता अनुभवाल. व्यवसायात अडचणी येतील. संततीशी मतभेद होतील. त्यांच्या तब्बेतीची काळजी राहील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. अनावश्यक खर्च वाढतील. वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. शक्यतो आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नये. राजकीय समस्या उदभवतील.
▪️धनू :
आज चंद्र 25 जानेवारी, 2024 गुरूवार च्या दिवशी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपणास खूप सावध राहावे लागेल. कोणतेही नवीन काम आज सुरू न करणे आपल्या हिताचे राहील. आत्यंतिक संवेदनशीलतेमुळे मनःस्थिती दुःखी होईल. पाण्या पासून सावध राहावे लागेल. उक्ती व कृती संयमित ठेवावी लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कामांपासून दूर राहणे हितावह राहील. सरकार विरोधी कृत्या पासून अलिप्त राहावे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
▪️मकर :
आज चंद्र 25 जानेवारी, 2024 गुरूवार च्या दिवशी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. दैनंदिन काम सोडून आज आपण मनोरंजन व गाठी भेटी ह्यात आपला वेळ घालवाल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मित्रांसह फिरायला जाल. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासात वेळ चांगला घालवाल. मोठया धनलाभाची संभावना आहे. व्यापार वाढेल. भागीदारीतून लाभ होईल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादीतून भरपूर प्राप्ती होईल. मान – सन्मान वाढतील. कामातील सफलते बरोबरच स्वास्थ्य सुद्धा उत्तम राहील.
▪️कुंभ :
आज चंद्र 25 जानेवारी, 2024 गुरूवार च्या दिवशी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस कार्य सिद्धीच्या दृष्टीने शुभ फलदायी आहे. कार्यातील यशाने आपली प्रसिद्धी होईल. कुटुंबीयांसह वेळ चांगला जाईल. घरातील वातावरण चांगले राहील. तन – मन उत्साही व आनंदी असेल. भावनात्मक विचारांचा दिवस आहे. नोकरीत सहकार्यांच्या मदतीने कार्य तडीस न्याल. कामानिमित्त पैसा खर्च होईल.
▪️मीन :
आज चंद्र 25 जानेवारी, 2024 गुरूवार च्या दिवशी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण कल्पना विश्वात विहार करणे पसंत कराल. साहित्य लेखनात आपण सृजनशीलता दाखवू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. प्रेमालाप होईल. शेअर – सट्टा बाजारात लाभ होईल. मानसिक समतोल मात्र राखावा लागेल.