रत्नागिरी येथील भाजपा कार्यकर्त्या मेळाव्याला भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी- आपकी बार ४०० सो पार; “फिर एक बार मोदी सरकार” असं म्हणत मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग हा हक्काचा खासदार दिल्लीत पाठवूया — केंद्रीय मंत्री नारायण राणे.
आज रत्नागिरी जिल्ह्यातील स्वयंवर मंगल कार्यालय येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यात माननीय नारायणराव राणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गेले दहा वर्ष या मतदारसंघाचे वाताहात झाली आपली सर्वांची दहा वर्ष फुकट गेली अशा निष्क्रिय माणसाला आपण निवडून दिल्याने रत्नागिरी सिंधुदुर्गचा विकास ठप्प झाला आणि म्हणूनच अबकी बार 400 पार म्हणत मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी आणि या कोकणच्या विकासासाठी आपल्या हक्काचा माणूस दिल्लीत पाठवूया आणि आपला मतदारसंघ देशात उच्च पातळीवर नेऊन पोचवूया. उद्योगधंदे रोजगार विविध विकास कामे ही पूर्ण करण्यासाठी आणि मोदींचे हात बळकट करण्यासाठी आपण आज पासून कामाला लागा सिंधुदुर्ग प्रमाणे रत्नागिरीचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही असे उद्गार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी येथील भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात काढले.
यावेळी उपस्थित भाजपा रत्नागिरी शहर, भाजपा रत्नागिरी दक्षिण व भाजपा रत्नागिरी उत्तर मधील प्रमुख पदाधिकारी, बूथ वारियर्स, बूथ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख यांच्याशी संवाद साधला.
या मतदारसंघातून निवडून येण्याची क्षमता केवळ भारतीय जनता पक्षाची असून भाजपाचाच उमेदवार निवडून येणार.
यावेळी माजी खासदार माननीय निलेशजी राणे, लोकसभा सहप्रभारी माननीय बाळ माने, रत्नागिरी दक्षिण जिल्हा अध्यक्ष श्री.राजेश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, बाबासाहेब परूळेकर, अशोक मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.