
*राजापूर-* राजापूर तालुक्यातील होळी गावात श्री. भरतदुर्गा देवी मंदिराच्या चांदीच्या कलशारोहण सोहळ्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या मंगल प्रसंगी ग्रामस्थांनी भव्य शोभायात्रा आणि सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन केले आहे.
या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध रांगोळी कलाकार केदार टेमकर यांनी साकारलेली ‘प्रयागराज कुंभमेळा’ ची अप्रतिम रांगोळी. मंदीराच्या प्रांगणात साकारलेली ही भव्य कलाकृती भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
गावातील नागरिक, भाविक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने या सोहळ्यास हजर आहेत. संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाला अधिकच रंगत आणली आहे.