
देवरुख:- आमदार श्री शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचार फेरीच्या नियोजनासाठी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस ओझरे गटाची बैठक आमदार श्री शेखर निकम यांच्या नेतृत्वात संपन्न झाली
ओझरे जि. प. गटातून महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे, यांना जास्तितजास्त मताधिक्य मिळणार असा विश्वास आमदार श्री शेखर निकम यांनी दिला
यावेळी भाजपचे संगमेश्वर चिपळुण चे प्रभारी प्रमोद अधटराव; राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्र पोमेडकर, भाजपा तालुका अध्यक्ष रुपेश कदम,रत्नागिरी जिल्हा बँक संचालक राजेंद्र सुर्वे,ओझरे जिल्हा परिषद गट अध्यक्ष संतोष जाधव, यांच्यासह ओझरे जि. प. गटातील प्रमुख पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित होते.