मुंबई- भाजपाने राज्यसभा उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डाँ. अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे. तर ज्यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती, त्या पकंजा मुंडेंना मात्र यावेळी वगळण्यात आले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कालच भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आज त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्याचबरोबर कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना २०१९ मध्ये विधानसभेसाठी उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्या काहीशा नाराज होत्या. त्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडेही आपली तक्रार नोंदविली होती. आज राज्यसभेसाठी त्यांना उमेदवारी देऊन भाजपाने एकप्रकारे त्यांचे पुर्नवसन केल्याचे दिसत आहे. नांदेडमधून भाजपाने दोन उमेदवार दिले आहेत. डॉ. अजित गोपछडे आणि अशोक चव्हाण हे दोन्ही नेते नांदेड जिल्ह्यातील आहेत.