महायुती च्या प्रचार कार्यालयाचे 14 एप्रिल 2024 रोजी होणार उदघाटन….
रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र जोरदार वाहू लागले आहेत.रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघासाठी महायुतीचे जेके फाईल रत्नागिरी येथे प्रचार कार्यालय उभे राहिले असून या कार्यालयाचे उद्घाटन उद्या सायंकाळी सात वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महायुतीच्या माध्यमातून बैठकांचा सपाटा लावण्यात येत आहे. प्रत्येक गावात जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गट, शहरांमध्ये प्रभागांमध्ये अशाप्रकारे बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जिल्ह्यात बैठकांचे आयोजन करण्यात आले. उद्या दी.१४ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता चिपळूण शहर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुपारी साडेतीन वाजता चिपळूण ग्रामीण राधाताई लाड सभागृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.सायंकाळी साडेपाच वाजता संगमेश्वर येथे लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय म्हाबळे येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
तर सायंकाळी ७ वाजता प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रत्नागिरी जे.के. फाईल एल.जी. शोरूम शेजारी येथे रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास लोकसभा सहप्रभारी बाळासाहेब माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, अतुलजी काळसेकर, प्रमोद अधटराव, उल्का विश्वासराव, मंडल अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते, तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या उद्घाटनास उपस्थित राहणार असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले आहे.