पंतप्रधान नरेंद्र मोदींकी ” मन कि बात ” विश्वकर्मा बांधवोंके साथ …….

Spread the love

संगमेश्वर नावडी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ” मन कि बात ” कार्यक्रम सुतार समाज वाडकर कुटुंबा समवेत पाहिला ….

संगमेश्वर- प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन कि बात च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतात . या संवादातून देश पातळीवर ज्या ज्या चांगल्या बाबी घडलेल्या असतात त्याबाबत विवेचन करतात . त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या ज्ञानात भर पडते . ह्या वेळचा मन कि बात कार्यक्रम सुतार व शिल्पकार समाजाच्या बांधवांनी पहावा यासाठी भाजपा च्या वतीने संगमेश्वर मध्ये आयोजित करण्यात आला होता.

यावेळी मार्गदर्शन करताना भाजपा तालुका उपाध्यक्ष म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वकर्मा जयंती च्या निमित्ताने पीएम विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ केला . या योजनेमुळे विश्वकर्मांना ओळख व पाठबळ मिळाले आहे . तसेच असंघटित क्षेत्रातील पारंपरिक शिल्पकार व कारागीरांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध झाले आहे . त्यामुळे आर्थिक प्रगती साधता येईल . केंद्र सरकारच्या सुक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालया मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे , तरी सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले .

यावेळी रत्नागिरी पंचायतराज चे जिल्हा संयोजक गणेश पवार, जिल्हा उपाध्यक्ष कोमल रहाटे , तालुका उपाध्यक्ष अजिंक्य राज सुर्वे ,ज्येष्ठ नागरिक व भारतीय जनता पार्टीचे माजी प्रांत सदस्य प्रमोद शेटे ,संगमेश्वर शहराध्यक्ष अनुप प्रसादे वॉर रूम प्रमुख प्रसाद भिडे ,ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता माधवी भिडे ,रोहिदास समाजाचे रामदासजी आंबवकर ,नाभिक समाजाचे दिनेश आंब्रे ,नंदकुमार सुर्वे ,सुतार शिल्पकार समाज बांधव उपस्थित होते यावेळी यांचे वेळोवेळी समाज कामासाठी सहकार्य करणारे विनायक शेट्टी यांचा सत्कार अजिंक्य राज सुर्वे यांनी केला तसेच निधेवाडी येथील सुतार समाजाचे मुरलीधर वाडकर ,ममता वाडकर ,संपदा वाडकर सत्कारही करण्यात आला व विश्वकर्मा योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कटिबद्ध असल्याचे रामदास आंबवकर यांनी सांगितले . यावेळी सरल ॲप डाऊनलोड करून करून त्याविषयी मार्गदर्शन प्रसाद भिडे यांनी केले.

संगमेश्वर शहरातील नूतन पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ यावेळी करण्यात आला. शहराध्यक्ष अनुप प्रसाद यांनी सदर कार्यक्रमांमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. जिल्हा उपाध्यक्ष कोमल रहाटे यांनी महिलांना मार्गदर्शन केले . या वेळेला पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी तळागाळापर्यंत पोहोचून आता मी लोकसभा इलेक्शन मध्ये नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचा संकल्प केला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page