कुणबी प्रमाण पत्रासाठी मराठा समाजाचं तीव्र आंदोलन; क्षत्रिय मराठा महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते सुनील दळवी यांनी खोडा घातला?

Spread the love

गुहागर : समीर पेंडसे राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय पेटलेला असतानाच कोकणातील मराठा समाजाने मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. आम्हाला कुणबी मराठा असं प्रमाणपत्र नको, अशी भूमिका रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर येथे झालेला बैठकीत क्षत्रिय मराठा समाजाने घेतली आहे, अशी माहिती क्षत्रिय मराठा महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते सुनील दळवी यांनी दिली आहे.

१२० पदाधिकारी म्हणजे मराठा समाज? असा प्रश्न कोकणी मराठा समाजाकडून केला जात आहे

कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर येथे झालेल्या बैठकीला प्रत्येक तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित होते. एकूण १२० पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती सकल मराठा महासंघाचे पदाधिकारी सुनील दळवी यांनी दिली आहे. कुणबी मराठा अशा स्वरूपाचे प्रमाणपत्र नको तसा ठराव आज गुहागरमध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण देताना राज्य सरकार समोर नवे प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्या सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी चिपळूण येथे होत असलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत कोणती भूमिका घेतली जाते, याकडे मात्र अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

मराठा आरक्षणाला वेगळे वळण लावण्याच्या प्रयत्न केला जातोय?

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे हत्यार उपसून राज्य सरकारला अल्टी-मेटम दिला आहे. त्यामुळे राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. सगळ्याच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना अनेक ठिकाणी गावबंदी करण्यात आली आहे. 

मराठा समाजासाठी सरकारच्या असलेल्या शासकीय योजना समाजातील घटकांपर्यंत जाव्यात यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील मराठा सामाजाची शिखर संस्था स्थापन करण्याचा निर्णय देखील आज गुहागर येथील बैठकीत जाहीर करण्यात आला आहे.

यासाठी शिखर संघटनेची बैठक नोव्हेंबर महिन्यात दापोली येथे होणार आहे. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे, अशीही माहिती सुनील दळवी यांनी दिली आहे. या बैठकीला सुधीर भोसले, एड. संकेत साळवी एड. सौ. चव्हाण, कौस्तुभ सावंत, जानकी बेलोसे, संतोष घोसाळकर, किशोर दळवी, विनोद जाधव तसेच जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील क्षत्रिय मराठा समाजाचे एकूण १२० प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते, अशी माहिती सुनील दळवी यांनी दिली आहे.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page