पंतप्रधान मोदींनी काळाराम मंदिरात घेतले दर्शन:काळारामचे दर्शन घेणारे पहिले पंतप्रधान, जाणून घ्या काळाराम मंदिराचा इतिहास…

Spread the love

नाशिक- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेतले. तसेच मंदिरात पूजाही आणि आरती केली. मोदी मंदिरात पोहोचताच मंदिरातील पुजाऱ्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. मोदींकडून रामकुंड येथे जलपूजन आणि गोदावरीची आरतीही करण्यात आली. यावेळी मंदिरात येवल्याच्या पैठणीचा शेला देत मोदींचे स्वागत करण्यात आले.

काळाराम मंदिराचा इतिहास काय?…

काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत हे एक काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. येथे सीता व लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत.मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात.

काळाराम मंदिर भगवान श्री राम, माता सीता व बंधू लक्ष्मण यांना समर्पित आहे….

नाशिक जिल्ह्यातील काळाराम मंदिर भगवान श्री राम, माता सीता व बंधू लक्ष्मण यांना समर्पित आहे. हे अतिशय प्राचीन मंदिर आहे. असे मानले जाते की, 14 वर्षांच्या वनवासात श्रीराम आपली पत्नी सीता व भाऊ लक्ष्मण यांच्यासह पंचवटीत राहिले. यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक असे महत्त्व आहे.

245 फुट लांब व 145 फुट रुंद मंदिर परिसराला 17 फुट उच दगडाची भिंत आहे.मंदिरासाठी सर्व बाजुंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभामंडप आहे.मंदिरात प्रभू रामचंद्र, सिता, लक्ष्मण यांच्या काळया पाषाणातील 2 फुट उंचीच्या मुर्त्या आहेत.चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा उत्सव आयोजित करण्यात येतो.

मुख्य बसस्थानकापासून 3 किमी अंतरावर काळाराम मंदिर आहे.



प्रभू श्रीरामांनी पंचवटीत शुर्पनखाचे नाक,कान कापल्यानंतर 14 हजार राक्षस या ठिकाणी श्रीरामांवर हल्ला करण्यासाठी आले असता त्यावेळी प्रभू श्रीरामांनी छातीवर हात ठेवून प्रतिज्ञा केली आणि सर्व 14 हजार राक्षसांचा वध केल्याची अख्यायिका सांगितली जाते. त्याप्रसंगी अत्यंत विराट आणि भव्य कालस्वरूप रूप प्रभू श्रीरामांनी धारण केले होते. कालस्वरूप म्हणून श्री काळाराम नाव प्रसिद्ध झाले, त्यामुळे पुढे जाऊन श्री काळाराम मंदिर स्थापन झाले.


मंदीराच्या बांधकामासाठी 2000 कारागिर 12 वर्ष राबत होते. पश्चिम भारतातील प्रभु रामचंद्राच्या सुंदर मंदिरांपैकी एक असे हे मंदीर आहे.


या भागात आहे मंदिर


नाशिक जिल्ह्याच्या शासकीय संकेतस्थळावर या मंदिराची बरीच माहिती उपलब्ध आहे. त्यानुसार नाशिक शहर परिसरातील पंचवटी भागात हे मंदिर आहे. मुख्य बसस्थानकापासून ते 3 किमी अंतरावर आहे. नाशिकच्या कोणत्याही कोपऱ्यातून तुम्ही इथे सहज पोहोचू शकता. चैत महिन्यातील रामनवमी उत्सव येथे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

नाशिकजवळच्या टाकळी येथे समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य होते. ते गोदावरीत स्नान करत आणि काळारामाच्या दर्शनाला येत होते. त्याकाळी हे मंदिर लाकडी होते. मात्र ,मूर्ती आज आहेत त्याच होत्या. अनेक श्लोक, करूणाष्टके, आरत्या यांच्या रचना समर्थांनी याच काळारामाच्या पुढ्यात केल्या आहेत. काळाराम मंदीर सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले.

काळारामचे दर्शन घेणारे पहिले पंतप्रधान…

दरम्यान, रामकुंडावरील जलविधी पूजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात दाखल झाले. त्यांनी या ठिकाणी काळारामचे दर्शन घेतले असे करणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. या ठिकाणी मोदींच्या हस्ते आरतीही झाली.

मोदींचे आगमन होताच भव्य रोड शो…

आज सकाळी पंतप्रधान मोदींचे नाशिकमध्ये आगमन झाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदींचे स्वागत केले. यावेळी मोदींचे आगमन होताच भव्य रोड शो पार पडला. यावेळी मोदींच्या स्वागतासाठी नाशिककरांची गर्दी पाहायला मिळाली. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह बावनकुळे हे देखील या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या नाशिक दौऱ्याला खास महत्त्व आहे.

राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नवी दिल्ली येथून वायू दलाच्या खास विमानाने नाशिकच्या ओझर विमानतळावर आगमन झाले. आज या महोत्सवाचे उदघाटन मोदींच्या हस्ते झाले आहे. तसेच मोदींनी यावेळी देशाला संबोधित देखील केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page