पुणे:- जेष्ठ प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वरयोगिनी प्रभा अत्रे (९२) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले.
प्रभा अत्रे या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक म्हणून गणल्या जात होत्या. त्या पं. सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या होत्या.
भारत सरकारने त्यांना संगीतक्षेत्रातील योगदाना बद्दल १९९० मध्ये “पद्मश्री” आणि २००२ मध्ये “पद्मभूषण” पुरस्काराने सन्मानित केले होते. हे पुरस्कार भारतातील अनुक्रमे चौथ्या तिसऱ्या क्रमांकाचे पुरस्कार आहेत. तसेच २०२२ मध्ये “पद्मविभूषण” देऊन त्यांचा गौरव केला.
ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व होते. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्यासाठी त्या काम करत होत्या.
त्यांना हृदयविकाराचा झटका आला म्हणून दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करणेत आले होते.
परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे नातेवाईक अमेरिकेत असल्याने ते आल्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
पुण्यात जन्मलेल्या प्रभा अत्रे यां वयाच्या आठव्या वर्षी शास्त्रीय गायनाकडे वळल्या. संगीत शिकत असतानाच त्यांनी विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही मिळवले.
प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा लौकिक होता.
गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, भजन, नाट्य संगीता वरही त्यांचे प्रभुत्व होते. भारतीय शास्त्रीय संगीत या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास होता.
ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांनी 11 पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. नवी दिल्लीत त्यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेत संगीतावरील 11 पुस्तकांचे प्रकाशन केले.