प्रज्ञानंदचा ऐतिहासिक विजय, 6 वेळा जागतिक चॅम्पियन झालेल्या मॅग्नस कार्लसनला केलं पराभूत…
भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं क्लासिकल चेसमध्ये मॅग्नस कार्लसनं पराभूत केलं. अशाप्रकारचा प्रथमच प्रज्ञानंदनं विजय मिळविला आहे.
स्टॅव्हेंगर (नॉर्वे): केवळ १८ वर्षाच्या असलेल्या भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं नॉर्वे येथील बुद्धिबळ स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला पराभूत केला. तीन फेऱ्यांनंतर 5.5 गुणांसह आघाडीचे स्थान मिळवून प्रज्ञानंदनं हा विजय मिळविला आहे.
भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत जागतिक क्रमवारीत प्रथमच मॅग्नस कार्लसनचा क्लासिकल फॉरमॅटमध्ये पराभव केला. गेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रज्ञानंदचा मॅग्नसचा पराभूत झाल्यानंतर प्रज्ञानंदनं हा विजय मिळविला. जागतिक चॅम्पियन डिंग लिरेन विरुद्ध 2-0 अशी आघाडी प्रज्ञानंदने नॉर्वे बुद्धिबळ 2024 मुख्य स्पर्धेच्या फेरीत आपला पहिला शास्त्रीय ड्रॉ खेळला.
7 जूनपर्यंत चालणार स्पर्धा…
नॉर्वे बुद्धिबळ महिला स्पर्धेत वैशाली आरनं भारतीय सहकारी कोनेरू हम्पीचा पराभव करून पहिला शास्त्रीय विजय नोंदवला. ओपनिंगमध्ये हम्पीनं दबावाखाली एक गंभीर चूक केली. त्यामुळे वैशालीला विजयी ठरली. तिनं थेट भारताच्या पहिल्या क्रमांकाच्या महिला खेळाडूविरुद्धचा पहिला विजय मिळूवन क्रमवारीत भारताची नंबर दोनची महिला खेळाडू ठरली आहे. नॉर्वे बुद्धिबळ 2024 ची धमाकेदार सुरुवात झाली ही स्पर्धा 27 मे रोजी सुरू झाली असून 7 जूनपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत जगातील दिग्गज बुद्धिबळपटू सहभाग घेत आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेत महिला खेळाडूसह पुरुष खेळाडुंना समान बक्षीस देण्यात येणार आहेत.
कोणाकडून प्रज्ञानंदला मिळते प्रेरणा..
भारतीय युवा बुद्धीपळपटू रमेशबाबू प्रज्ञानंदनं अत्यंत कमी कालावधीत जागतिक पातळीवर बुद्धीबळ स्पर्धेत यश मिळवलं. लहापणी रमेशबाबू प्रज्ञानंदला कार्टुन पाहण्याचा छंद होता. कार्टुन पाहण्याची सवय घालविण्याकरिता कुटुंबातील लोकांनी प्रज्ञानंदला बुद्धीबळ खेळण्याची प्रेरणा दिली. त्यानंतर प्रज्ञानंदनं मोठ्या बहिणीकडून प्रेरणा घेत विविध स्पर्धांमध्ये यश मिळविले. दोन्ही बहिण-भावडांनी जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत यश मिळवून भारताचं नाव उंचावलं आहे.