लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा रुट मार्च…

Spread the love

पनवेल (संजय कदम) : देशभरात आज लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या पार्शवभूमीवर पनवेल शहर पोलिसांनी शहरामध्ये रूटमार्च काढला.

आज सकाळी पनवेल शहर पोलीस ठाणे येथून सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्यासह आरपीएफ चे 3 अधिकारी आणि 29 जवान, मुख्य ठिकाणी पोलीस स्टेशन चे अधिकारी अंमलदार आणि आरपीएफ टीम या रूटमार्च मध्ये सहभागी झाले होते.
पनवेल शहरातील विविध ठिकाणांहून हा रूटमार्च काढण्यात आला त्यानंतर याची सांगता सावरकर चौक येथे करण्यात आली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page