खालापूरात डान्सबारवर पोलिसांचे छापे , ३२ बारबालांसह ४० जणांवर गुन्हे दाखल….

Spread the love


खोपोली | ऑर्केस्टाच्या नावाखाली अश्लिल हावभाव करुन वीभत्स नृत्य करणार्‍या खालापूर तालुक्यातील तीन डान्सबारवर रायगड स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला. यामध्ये ३२ बारबालांसह ४० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चक्री जुगार, मटका आणि आता डान्सबार…रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी अवैध धंद्याविरोधात मोहिमच उघडली आहे.

26 जानेवारी रोजी सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या उपोषणाचा परिणाम अवैधन वर कारवाई…


26 जानेवारी रोजी रायगड येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी आझाद मैदान येथे आमरण उपोषण केले होते. रायगड मध्ये अनधिकृत धंदे चालू असून पोलीस अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते. झालेली कारवाई त्यामुळे झाली असावी असे जनमानसात म्हणणे आहे. ऑर्केस्ट्रा च्या नावावर तीच डान्सबार चालवली जात आहे. कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती. नियम व अटी यांचे भंग वारंवार केले जाते परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. पेणमधील एडवोकेट कृष्णकांत ठाकूर यांनी कार्यकर्त्यांसह मरण उपोषण केले होते


त्यामुळे असे धंदे करणार्‍यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. तालुक्यातील कलोते गावाच्या हद्दीत असलेल्या स्वागत, पूनम आणि लोधिवली येथे ऑर्केस्टा बारमध्ये मनोरंजनाच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांची टिम कामाला लागली. शनिवारी, २२ फेब्रुवारी रोजी रात्री हॉटेल समुद्रा येथे पोलिसांनी धाड टाकली.



याठिकणी राहुल नरेश यादव याच्यासह ८ बारबाला, ७ ग्राहक तसेच ७ अन्य कर्मचारी असे २२ जणांवर कारवाई करण्यात आली. दुसरी कारवाई स्वागत हॉटेलवर करण्यात आली. याठिकाणी मिरा खातून सुखचंद शंखेब हिच्यासह १२ बारबाला, १० ग्राहक तसेच सहा कर्मचारी असे २८ जण आढळून आले. तर पुनम बार तोश संजिवा मोगवीरा याच्यासह १२ बारबाला, ७ ग्राहक आणि ३ कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लेडीज बारवरील या कारवाईमुळे बार मालकांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी, पोलीस निरीक्षक रुपेश नरे, पोलीस उपनिरीक्षक लिगण्या सरगर, पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक राजेन पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक प्रसत्र जोनी यांच्यासह अन्य कर्मचारी तसे एक बांगलादेशी पथक सहभागी झाले होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page