महाशिवरात्रीला ‘या’ राशीच्या लोकांना मिळेल भगवान शिवाचा आशीर्वाद; वाचा राशीभविष्य…

Spread the love

ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

▪️मेष :

आज चंद्र मकर राशीत आहे. आज आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी महत्वाच्या मुद्दया संबंधी वरिष्ठांशी विचार – विनिमय होतील. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल. कार्यभार वाढेल. कौटुंबिक गोष्टीत मनापासून रस घेऊन कुटुंबियाबशी सल्ला – मसलात कराल. गृहसजावटीचे आयोजन कराल. आईशी जास्त जवळीक निर्माण होईल.

▪️वृषभ :

आज चंद्र मकर राशीत आहे. व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आर्थिक लाभ प्राप्त होतील. विदेशातील मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून येणार्‍या बातम्या आपणाला फायदेशीर ठरतील. दूरच्या प्रवासाची शक्यता आहे. कामाचा व्याप थकवा आणि उबग आणेल.

▪️मिथुन :

आज चंद्र मकर राशीत आहे. आज अनियंत्रित रागाला लगाम घालावा लागेल. बदनामी आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहणं हिताचं ठरेल. खर्च अधिक झाल्यानं आर्थिक चणचण भासेल. कुटुंबीय आणि कार्यालयातील सहकारी यांच्याशी मतभेद किंवा वादविवादाचे प्रसंग येतील. त्यामुळं मन सुन्न राहील. आजारी व्यक्तीची नव्यानं तपासणी किंवा शस्त्रक्रिया शक्यतो आज करू नका. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करा.

▪️कर्क :

आज चंद्र मकर राशीत आहे. आजचा दिवस सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रांत आपणाला लाभदायक ठरेल. मौज – मजेची साधने, उत्तम दागिने आणि वाहन खरेदी होईल. मौज – मस्ती आणि मनोरंजनात वेळ खर्च होईल. तसेच भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास आपणास सुखद अनुभव देईल. दांपत्य जीवनात उत्कट प्रेमाचा अनुभव येईल. भागीदारीत फायदा होईल. सहलीची शक्यता आहे.

▪️सिंह :

आज चंद्र मकर राशीत आहे. आज उदासीन वृत्ती आणि संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. त्यामुळं मनःस्वास्थ्य लाभणार नाही. तरीही घरात शांततेचे वातावरण राहील. दैनंदिन कामात जरा अडचणी येतील. खूप परिश्रम कराल. वरिष्ठांशी वाद – विवाद टाळा.

▪️कन्या :

आज चंद्र मकर राशीत आहे. पोटाच्या त्रासामुळं प्रकृती बिघडेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. अचानक धनखर्च होईल. बौद्धिक चर्चेत असफल व्हाल. प्रियव्यक्तीचा सहवास लाभेल. भिन्नलिंगी व्यक्तीकडं आकर्षित व्हाल. शेअर, सट्टा ह्यापासून दूर राहणं उत्तम ठरेल.

▪️तूळ :

आज चंद्र मकर राशीत आहे. आज आपण खूप भावनाशील व्हाल आणि त्यामुळं मानसिक अस्वास्थ्य राहील. आईशी मतभेद होतील किंवा तिच्या प्रकृतीची काळजी राहील. प्रवासासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. कौटुंबिक आणि जमीन – जुमल्या संबंधी चर्चा करताना दक्ष राहा. पाण्यापासून जपून राहा.

▪️वृश्चिक :

आज चंद्र मकर राशीत आहे. आजचा दिवस कार्यात यश आणि आर्थिक लाभ मिळवून देणारा आहे. नवीन कार्याचा आरंभ करू शकता. भावंडांशी अधिक सहयोगपूर्ण आणि प्रेमाचे संबंध राहतील. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. प्रिय व्यक्तीच्या सहवासानं मनाला आनंद वाटेल. जवळपासचा प्रवास होईल. आरोग्य उत्तम राहील.

▪️धनू :

आज चंद्र मकर राशीत आहे. आज द्विधा मनःस्थिती आणि घरातील बिघडलेले वातावरण यामुळं त्रास होईल. नाहक खर्च होईल. कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. महत्वाचे निर्णय घेणं हिताचे ठरणार नाही. कुटुंबियांचे गैरसमज होणार नाहीत यासाठी प्रयत्न करावे लागतील. दूरस्थ मित्र वा नातलग यांना तोंड द्यावं लागेल. त्यांच्याकडून येणार्‍या बातम्या किंवा निरोप आपणांस लाभदायक ठरतील.

▪️मकर :

आज चंद्र मकर राशीत आहे. आजच्या दिवसाची सुरूवात मंगल वातावरणानं होईल. एखादा मांगलिक प्रसंग घडेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. आपले प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. मित्र आणि आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळतील. शारीरिक आणि मानसिक दृष्टया प्रसन्न राहाल. नोकरी – व्यवसायात पण अनुकूल वातावरण राहील. दांपत्य जीवनात परमानंद लाभेल. घसरणे, पडणे, जखम होणे यांपासून सावध राहा.

▪️कुंभ :

आज चंद्र मकर राशीत आहे. आज शक्यतो आर्थिक देवाण – घेवाणीचे व्यवहार करू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. स्वकीयांशी मतभेद होतील. इतर कोणाचे हित करण्याच्या प्रयत्नात स्वतः अडचणीत येण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. मानहानी होण्याची शक्यता आहे.

▪️मीन :

आज चंद्र मकर राशीत आहे. आज आपणास सामाजिक कार्यात किंवा समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. मित्र – स्नेह्यांशी सुसंवाद साधल्यानं मनाला आनंद होईल. सुंदर स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत ठरवाल. एखादी आनंददायी बातमी समजेल. पत्नी आणि संततीकडून लाभ होईल. अचानक धनप्राप्ती संभवत आहे. नवीन आणि महागडी वस्तू खरेदी करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page