
भोजपुरी इंडस्ट्रीचा सुपरस्टार पवन सिंग पुन्हा एकदा आपल्या गाण्यासोबत आला आहे. हरियाणाची डान्सिंग क्वीन सपना चौधरीसोबत पवन सिंगने आणखी एक धमाका केला आहे. त्याच्या लेटेस्ट ‘लेहंगा लहक जाई’ मध्ये पवन सपनासोबत डान्स करताना दिसत आहे, ज्याला प्रेक्षकांनीही पसंती दिली आहे. एका दिवसात, या गाण्याने यूट्यूबवर धमाल केली आहे आणि हे गाणे दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
पवन सिंगच्या ‘लेहंगा लहक जाई’ या गाण्याला अवघ्या एका दिवसात रेकॉर्डब्रेक व्ह्यूज मिळाले आहेत. VYRL भोजपुरी च्या चॅनलवर रिलीज झालेल्या या गाण्याला आतापर्यंत ५.३ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. त्याच वेळी, हे गाणे यूट्यूबवर नंबर दोनवर ट्रेंड करू लागले आहे. या गाण्यात सपना चौधरी आणि पवन सिंग आपल्या लटके-झटकेने चाहत्यांना वेड लावत आहेत. यासोबतच दोघांची केमिस्ट्रीही खूप पसंत केली जात आहे.
पवन सिंह आणि शिल्पी राज यांनी ‘लेहंगा लहक जाई’ला आवाज दिला आहे. तर गाण्याचे बोल धीरज बबुआन यांनी लिहिले आहेत. तसेच संगीत प्रियांशू सिंग आणि दिग्दर्शक दिपेश गोयल आहे. याशिवाय गाण्याची कोरिओग्राफी अमित सियाल आणि अंकित थापा यांनी केली आहे. व्हिडीओवर कमेंट करून चाहतेही गाण्याचे कौतुक करत आहेत.