नेटफ्लिक्स सिरीज ‘वेडनसडे’च्या अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप, शोमधून काढण्याची मागणीने धरला जोर

Spread the love

नेटफ्लिक्सची प्रसिद्ध वेब सिरीज ‘वेडनेसडे’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या सिरीजमधील प्रत्येक पात्राला चाहत्यांची भरभरून साथ लाभली आहे. ही सिरीज तिच्या दमदार स्टोरीमुळे सतत चर्चेत असते. ‘वेडनेसडे’ ही नेटफ्लिक्सची आतापर्यंतची सर्वात यशस्वी सिरीज म्हटले जात आहे. या सिरीजने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या सिरीजमधील पात्र पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. खरं तर, सोशल मीडिया युजर्स आता ‘वेडनेसडे’च्या एका अभिनेत्याला मालिकेतून काढून टाकण्याची मागणी करत आहेत.

सोशल मीडियावरील युजर्स ‘वेडनेसडे’ या सिरीजमध्ये झेवियरची भूमिका साकारणारा अभिनेता पर्सी हायनेस व्हाईटवर भडकले आहेत. पर्सी हायनेस व्हाईटला शोमधून काढून टाकण्याची मागणी यूजर्स करत आहेत. खरं तर, २१ वर्षीय पर्सी हायनेस व्हाईटवर त्याच्या हायस्कूलमधील महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्या महिलांनी सोशल मीडियावर याबद्दल खुलासा केला आहे.

महिलांनी पर्सी आणि त्याच्या मित्रांवर गंभीर आरोप केले आहेत. महिलांनी असा आरोप केला आहे की पर्सी हायनेस व्हाईट आणि त्याचे मित्र विशेषत: अशा स्त्रियांना भेटण्यासाठी बोलवत, ज्या त्यांना हॉट वाटतात. इतकंच नाही तर लैंगिक शोषणासोबतच या अभिनेत्यावर महिलांशी गैरवर्तन करण्याचा आणि त्यांचे बोल्ड फोटो त्यांना ऑनलाइन पाठवल्याचाही आरोप आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page