पनवेलच्या छमछमवर पोलीसांचा बडगा ; बारमालकांसह 37 बारबालांवर कारवाई होऊन ही पनवेल मध्ये छम छम चालू….

Spread the love

*पनवेल –* पनवेल परिसरातील लेडीज बार नियमांची पाय मल्ली करून डान्स पे चान्स मारत असल्याची माहिती उघड झाली आहे. आजही मोठ्या प्रमाणात बारबालांवर पैशांची उधळण केली जात आहे. सर्व नियम धाब्यावर बसवणार्‍या या छम छम वर नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. कारवाई करून आज रोजी पनवेल मध्ये बारच्या नावाखाली डान्स बार प्रमाणेच सर्व प्रक्रिया चालू आहेत. डान्सबार च्या नावावर बारबालांच्या अश्लील डान्स दोन वाजेपर्यंत चालू असतो. बारच्या आडराव वेश्या व्यवसाय हे जोरात चालू आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष असून जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात येत आहे.

पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पदभार घेतल्यानंतर अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणार्‍या बारवर जरब बसवण्याच्या दृष्टिकोनातून ठोस पावले उचलली गेली आहेत.नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये लेडीज बार ची संख्या जास्त आहे. वास्तविक पाहता डान्सबारला बंदी घालण्यात आलेली आहे.

स्थानिकांबरोबरच घाटमाथ्यावरून मोठ्या प्रमाणात आंबट शौकीन लेडीज बार मध्ये येतात. विशेष करून कोन परिसरात मुंबई पुणे महामार्ग लगत बारचं हब आहे. बाहेरच्या अनेक गाड्या या बार समोर लागतात. नियम आणि अटी पायदळी तुडवून रात्री उशिरापर्यंत ऑर्केस्ट्राच्या नावाने बारबाला ग्राहकांसमोर हिडीस आणि अश्लील नृत्य करतात.

ऑर्केस्ट्रा आणि सर्व्हीसच्या नावाखाली डान्स बार सुरू आहे. बारचालक नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत.दरम्यान, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त संजय यनपुरे तसेच परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनीही कारवाईचा बडगा उगारण्याचे सूचित केले. त्यानुसार संबंधित बारवर परिमंडळ दोनच्या हद्दीमध्ये कारवाई करण्यात आली आहे.

तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत साईराज आणि चांदणी बार आणि आर्केस्ट्रा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये 37 महिला वेटर म्हणजेच बारबाला. त्याचबरोबर पुरुष वेटर, ग्राहक, बारमालक आणि व्यवस्थापक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

*खांदेश्वर, पनवेल पोलिसांकडूनही कारवाई…*

खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आसूड गाव येथे असणार्‍या इंटरनेट बारवर स्थानिक पोलिसांनी कारवाई केली. त्याचबरोबर पनवेल शहर पोलीस ठाण्यातील पथकाने चाणक्य आणि कपल ऑर्केस्ट्रा बार येथे कारवाईचा बडगा उघडला. याशिवाय परिमंडळ-2 हद्दीमध्ये इतर कारवाया सुद्धा करण्यात आल्या.

*कोन हद्दीमध्ये लेडीज बार हब!…*

मुंबई-पुणे महामार्गालगत कोन गावच्या हद्दीमध्ये दुतर्फा लेडीज बार थाटण्यात आले आहेत. हे बार तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने येथे येण्यासाठी अधिकार्‍यांची स्पर्धा लागते. उप व सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम करणारे अधिकारी या ठिकाणी फिरून परत येतात. पनवेल तालुका पोलीस स्टेशन लेडीज बारमुळे अत्यंत क्रीम पोस्टिंग समजले जाते. अधिकारीच नव्हे तर पोलीस कर्मचारी या ठिकाणी नेमणूक करून घेतात. काही अंमलदार बदली झाल्यानंतर ही परत त्या ठिकाणी येतात. ही मक्तेदारी मोडीत काढण्यामध्ये पोलीस आयुक्त आणि उपायुक्त नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

*कोन बीटमध्ये आर्थिक मलिदा!…*

कोन बीट मिळावे यासाठी अधिकार्‍यांमध्ये ही स्पर्धा आणि वशिलेबाजी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कर्मचारी सुद्धा हे बीट मिळावे यासाठी प्रयत्नात असतात. त्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांची अक्षरशा मनधरणी केली जाते. प्रभारी अधिकारी आपल्या मर्जीतील अंमलदारांना त्या ठिकाणी नियुक्त करतात. याचे कारण म्हणजे संबंधित कोन बीटमध्ये नेमणुकीस असलेल्यांना आर्थिक मलिदा मिळत असल्याने या ठिकाणी अक्षरशः चढाओढ सुरू आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page