‘लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या, पुढे मी…’, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य…

Spread the love

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडच्या जनतेला भावनिक साद घातली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत कदाचित पंकजा मुंडे यांना भाजपकडून उमेदवारीचं तिकीट दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा आहे. असं असताना आज पंकजा मुंडे यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे.

‘लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या, पुढे मी…’, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य…

प्रतिनिधी, बीड | 9 मार्च 2024- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होणार का? हा प्रश्न सातत्याने चर्चेत येतो. पंकजा मुंडे यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. तेव्हापासून कोणतीही निवडणूक जवळ आली की पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत येतं. पंकजा मुंडे यांचं नाव विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी चर्चेत आलं, त्यानंतर राज्यसभा निवडणुकीच्यावेळी देखील पंकजा यांचं नाव सातत्याने चर्चेत येतं. पंकजा मुंडे या भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्यांची बीडमध्ये मोठी ताकद आहे. बीडमधील मोठा जनसमुदाय पंकजा यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. पण तरीदेखील भाजपकडून अद्याप पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन झालेलं नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कदाचित पंकजा मुंडे यांना भाजपकडून उमेदवारीचं तिकीट दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा आहे. असं असताना आज पंकजा मुंडे यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांनी जनतेला थेट साकडंच घातलं आहे. त्यांच्या या भावनिक आवाहानाला जनता प्रतिसाद देते का? ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण त्यांच्या भावनिक आवाहानाची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

“लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या. पुढे मी तुमची काळजी घेईन”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या शिरूर येथे आज सिद्धेश्वर देवस्थान संस्थांच्या हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांनी उपस्थिती लावली. यावेळी भाषणामध्ये बोलताना पंकजा मुंडे यांनी नागरिकांना भावनिक आवाहन केलं. “मी सध्या माजी असून तुम्हाला काय देऊ? असा प्रश्न मला पडतो. मंचावर बसलेले सुरेश धस, बाळासाहेब आजबे, प्रीतम मुंडे हे सत्ताधारी आहेत. त्यामुळे आजी लोकांनी माजी लोकांची काळजी घ्यावी, असं म्हणत लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या. पुढे मी तुमची काळजी घेईन”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

‘माझ्यावर रेड पडली तेव्हा…’..

“मला कोणी माजी केलं हे आता सांगता पण येत नाही. कारण सगळेच एकत्र आले आहेत. पण जेव्हा माझ्यावर रेड पडली तेव्हा माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी 11 कोटी रुपये जमा केले. हे माझ्या लोकांच्या हृदयाशी जोडलेलं नातं आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. “सरकार सध्या तीन इंजिनने जोडलेला असून काही वेळ हे इंजिन एकमेकांना भिडले होते. मात्र आता ते बरोबर पटरीवर चालत आहेत”, असं देखील पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page