दिल्ली/प्रतिनिधी- भाजपच्या कार्यकर्त्यांना गेले २० वर्ष त्रास देणाऱ्या आणि भाजपची कामे मुद्दाम रखडवून ठेवणाऱ्या सामंत बंधूना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप स्वीकारण्यास तयार नाही. इतकेच नव्हे तर गेल्या वीस वर्षात हिंदुत्व विरोधी पावले उचलणाऱ्या सामंत बंधू यांना भाजपने तिकीट दिल्यास हिंदुत्ववादी मंडळी खासदारकीला उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे. त्यामूळे भाजपने हिंदुत्ववादी चेहरा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मदारसंघांत द्यावा, अशी मागणी होत आहे. ही मागणी भाजपच्या वरिष्ठ स्तरावर करण्यात आली असल्याने भाजपचा उमेदवार निष्ठावंत आणि कमळ याच चिन्हावर असेल असे आश्वासन देण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार ३० मार्च रोजी तिकीट जाहीर करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
भाजपच्या वरिष्ठांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सामंत बंधू यांनी आजतागायत भाजप संपविण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या निवडून आलेल्या अनेकांना साम दाम दंड भेद या वृत्तीने फोडून भाजप संपविण्याचा प्रयत्न केला. वीस वर्षात भाजप फोडन्याचे काम केले असल्याने त्यांना भाजपच्या चिन्हावर नव्हे तर युतीत तिकीट देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. सामंत यांनी कायम हिंदुत्व विरोधी भूमिका घेतली. वक्फ बोर्ड आणणे असो, अनधिकृत मशिदी अधिकृत करण्याचे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणे असो, अनधिकृत मजारीला पोलीस पहारा देण्यासाठी आणलेला दबाव असो, मिरकरवाड्यातील अनधिकृत कामावर हातोडा फिरविण्यात गेलेल्या अधिकाऱ्यांना रोखण्यात घेतलेला पुढाकार असो या सगळ्या घटना हिंदुत्व विरोधी असल्याचे वरिष्ठांच्या कानावर घालण्यात आले आहे. शिवाय हिंदुत्व विरोधी भूमिका घेऊन सोशल मीडियावर बोलणाऱ्या तरुणांना पोलिस स्थानकात जाऊन सोडविण्याचे काम देखील सामंत यांनी केल्याचे वरिष्ठांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार निष्ठावंत आणि कमळ याच चिन्हावर असेल असे आश्वासन देण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार ३० मार्च रोजी तिकीट जाहीर करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
दरम्यान हिंदुत्ववादी मंडळी एकत्र येऊन खासदारकीला उमेदवार उभा करण्याची शक्यता या मागणीवरून समोर आली आहे. तेव्हा सामंत यांना मतदारसंघात विरोध असल्याचे पुढे आले आहे.