फुणगूस गावच्या विकास कामाला स्वतःला पुढारी समजणारेच करतायत विरोध…

Spread the love

फुणगुस (प्रतिनिधी) – संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस येथे गाव खाडीसमांतर रस्त्यांची गेली १५ ते २० वर्षांपूर्वीची मागणी आज पुर्ण होत आहे.परचुरी ते फुणगूस खाडीसमांतर रस्त्याच्या रुंदीकरणांस चांगल्याप्रकारे सुरुवात झाली असून गावातील काही विघ्नसंतोषी आणि स्वतःला मोठे राजकारणी समजणारे काही लोक रस्त्याच्या बाजूला चिरे ठेवून होणाऱ्या विकास कामामध्ये अडथळे निर्माण करत आहेत, त्यामुळे गावातील विकास कामांमध्ये मोठे अडथळे निर्माण होत आहेत.

तरी सरकारी अधिकारी यांनी लवकरच अशा लोकांना चांगल्या प्रकारे समज देऊन गावातील विकास कामांमधील अडथळे दूर करून ती कामे लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा,अशी अपेक्षा गावातील नागरिक करत आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page