जागतिक महिला दिनानिमित्त दिव्यात शिवसेना महिला भगिनींची भव्य सन्मान रॅली

Spread the love

दिवा (प्रतिनिधी ) 8 मार्च जागतिक महिला दिनानिमीत्त दिवा शहरात शिवसेनेच्या शेकडो पदाधिकारी आणि महिला एकत्र येत भव्य दिव्य सन्मान रॅली काढली.यावेळी महिलांनी भगवे फेटे आणि भगवे झेंडे हाती घेऊन परिसर भगवामय करुन टाकला होता. या सन्मान रॅलीत अनेक महीलांचा गौरव करण्यात आला.

महीला दिन रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व महिलांचे शिवसेना दिवा शहर यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. सदर रॅलीमध्ये शिवसेना युवतीप्रमुख साक्षी रमाकांत मढवी, माजी नगरसेविका सौ. दीपाली उमेश भगत,सौ. सरिता रमाकांत मढवी, सौ. अर्चना निलेश पाटील, सौ. भाग्यश्री गुरुनाथ पाटील, सौ.ज्योती दीपक जाधव,मा.नगरसेविका सौ. दर्शना चरणदास म्हात्रे, सौ. मेघा शशिकांत पाटील, सौ.सुविता विनोद मढवी आदी प्रमुख महिलांचीह विशेष उपस्थिती लाभली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page