
खासदार नारायण राणे, मत्स्यव्यवसाय व बंदर विकासमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार शेखर निकम यांची प्रमुख उपस्थिती…
संगमेश्वर तालुका भाजपच्यावतीने अभिष्टचिंतन सोहळा व बैलगाडा शर्यतीचे आयोजन…

*देवरूख-* माजी केंद्रीय मंत्री व रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त संगमेश्वर तालुका भाजपातर्फे दि. १० एप्रिल रोजी देवरूख येथे अभिष्टचिंतन सोहळा व रत्नसिंधु महाराष्ट्र केसरी भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संगमेश्वर तालुका भाजपच्यावतीने आज रविवारी सायंकाळी देवरूख येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
देवरूख येथील भाजपच्या कार्यालयात आज रविवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते मुकुंद जोशी, तालुकाध्यक्ष रूपेश कदम, तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष केदारी, अभिजित शेट्ये, सुशांत मुळ्ये, निलेश भुरवणे, सुधीर यशवंतराव, पंढरीनाथ मोहिरे, अभिजित सप्रे, प्रमोद शिंदे, दत्ताराम नार्वेकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाळू ढवळे, शिवसेना शिंदे गटाचे प्रसाद सावंत, सचिन मांगले आदि उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष रूपेश कदम यांनी म्हटले कि, रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त संगमेश्वर तालुका भाजपातर्फे दि. १० रोजी सकाळी १० वा. देवरूख येथील मराठा भवन येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर याचदिवशी देवरूख कांजिवरा येथे सकाळी ११ वा. रत्नसिंधू महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत २०० बैलगाड्या सहभागी होणार असून एकाच वेळी ५ बैलगाड्या धावणार आहेत.


स्पर्धेतील प्रथम सहा क्रमांकाना अनुक्रमे ५१ हजार रुपये, ३५ हजार रुपये, २५ हजार, १५ हजार, १० हजार व ५ हजार रुपये व प्रत्येकी मानाची ढाल अशी बक्षिसे आहेत. तर सहभागी स्पर्धकांना आयोजकांच्यावतीने सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. अभिष्टचिंतन सोहळ्याला व बैलगाडा शर्यतीवेळी रत्नागिरी- सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे, मत्स्यव्यवसाय व बंदर विकासमंत्री नितेश राणे, माजी खासदार व आमदार निलेश राणे, आमदार शेखर निकम, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, बैलगाडा चालक मालक संघाचे जिल्ह्याध्यक्ष प्रदीप कदम, भाजपचे चिपळूण- संगमेश्वर विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रमोद अधटराव, रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनचे अध्यक्ष स्वप्नील शिंदे आदिंसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. गुरूवारी कोसुंब येथे हेलिकॉप्टरने खासदार श्री. नारायण राणे यांचे आगमन होणार आहे. यानंतर शहरातील मराठा भवन सभागृहात खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा दिमाखात साजरा होणार आहे. यानंतर श्री.राणे व मान्यवर बैलगाडा स्पर्धेठिकाणी दाखल होणार आहेत. बैलगाडा शर्यतीसाठी ९ रोजीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणीची मुदत आहे. अधिक माहितीसाठी अण्णा बेर्डे ९४२२४३२६७३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तर अभिष्टचिंतन सोहळ्याला महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे तसेच बैलगाडा शर्यतीचा बैलगाडा शर्यत प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन संगमेश्वर तालुका भाजपतर्फे करण्यात आले आहे.