प्रशांत यादव यांनी देवरूखमधील जेष्ठ व्यक्तींचेही घेतले आशिर्वाद…
देवरूख- चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव आणि माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी आज शुक्रवारी लक्ष्मीपूजनच्या शुभमुहूर्तावर सायंकाळी देवरुख शहरातील व्यापारी बंधू आणि नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशांत यादव यांनी जेष्ठ व्यक्तींचे आशिर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशांत यादव हे चिपळूणमधून देवरूख येथे सायंकाळी आल्यानंतर त्यांच्या शुभेच्छा रँलीला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रारंभ झाला. यानंतर प्रशांत यादव यांनी व्यापाऱ्यांची भेट घेत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, काँग्रेसचे नेते सहदेव बेटकर, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बंड्या बोरुकर, युवानेते प्रद्युम्न माने, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन वनकर, तालुकाध्यक्ष बाबा साळवी, महिला तालुकाध्यक्षा दिपीका किर्वे, देवरुख शहराध्यक्ष निलेश भुवड, माजी सभापती संतोष लाड, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबा सावंत, मुन्ना थरवळ, माजी उपसभापती छोट्या गवाणकर, पप्पू नाखरेकर, अयुब कापडी, श्रीम. खेडेकर, जनक जागुष्टे, इस्त्याक कापडी, रेहान गडकरी, विनित बेर्डे, राजा मोहिते, सचिन जाधव, संजय मोहिते, दादा शिंदे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.