पंचांगानुसार, शनी 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. तर, 27 डिसेंबरपर्यंत तो याच नक्षत्रात असणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनी हा सर्वात क्रूर ग्रह मानला जातो. शनी (Shani Dev) हा असा एकमेव ग्रह आहे जो व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. यामुळेच शनीला (Lord Shani) आपण न्यायदेवता किंवा कर्मफळ दाता म्हणतो. ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी शनीची साडेसाती आणि ढैय्याचा सामना करावा लागतो. शनी हा सर्वात धिम्या गतीने चालणारा ग्रह आहे. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी जवळपास अडीच वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळेच शनीला एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी जवळपास 30 वर्षांचा कालावधी लागतो.
येत्या ऑक्टोबर महिन्यात शनी नक्षत्र परिवर्तन करणार आहे. आणि राहूच्या नक्षत्रात म्हणजेच शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांना खूप लाभ मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
पंचांगानुसार, शनी 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. तर, 27 डिसेंबरपर्यंत तो याच नक्षत्रात असणार आहे. त्यानंतर पुन्हा पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
मेष रास-
मेष राशीच्या लोकांसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन फार लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. त्याचबरोबर धन-संपत्तीत चांगली वाढ होईल. नोकरी-व्यवसायात तुम्हाला अपार यश मिळेल. एकूणच तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.
धनु रास –
धनु राशीच्या लोकांसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून सरकारी किंवा खाजगी कामं रखडली असतील तर ती पूर्ण होतील. जे तरुण नोकरीच्या शोधात फिरतायत त्यांना चांगली नोकरी मिळेल. आयुष्यात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला मानसिक तणाव जाणवणार नाही. पार्टनरशिपमधून तुमचा बिझनेस चांगला चालेल.
सिंह रास-
सिंह राशीच्या लोकांसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन फार लाभदायक ठरणार आहे. तुमच्या आयुष्यात अनेक नवीन गोष्टी घडतील. तसेच, तुमचं वैवाहिक जीवन चांगलं असून तुमच्या जोडीदाराची तुम्हाला चांगली साथ मिळेल. विद्यार्थी शालेय शिक्षणात चांगली प्रगती करतील. त्यांच्या कलेला वाव मिळेल. नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. तसेच, परदेशी व्यापार तुमचा चांगला चालेल.