*देवरूख-* संगमेश्वर तालुक्यातील निवेखुर्द परबवाडी केंद्राची तिसरी शिक्षण परिषद नुकतीच केंद्र प्रमुख सुनिल करंबेळे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाली.
प्रारंभी हरपुडे शाळेचे मुख्याध्यापक आत्माराम बने यांनी उपस्थितांचे स्वागत केले. केंद्रीय प्रमुख करंबेळे यांच्या प्रास्ताविकानंतर इयत्ता पहिली दुसरीचे प्रभावी अध्यापन या विषया बद्दल शांताराम बावधने, शालेय ऑनलाईन कामाबाबत श्रीकांत केसरकर, योजनांचा जागरबद्दल विनय होडे, शिष्यवृती व नवोदय परीक्षेबद्दल आश्विनी सोळूंके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक सुभाष जाधव यांची पदोन्नतीने सांगवे शाळेत पदवीधर शिक्षक नेमणूक झाल्याबद्दल केंद्राच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक स्वप्नील झित्रे व विनय होडे यांनी स्वरचीत श्रावणा वरील कविता सादर केल्या.
केंद्रप्रमुख करंबेळे यांनी सखी सावित्री, विद्यार्थी सुरक्षितता समिती त्यांचे कार्य, महावाचन कार्यक्रम आनंददायी शनिवार, समाज कल्याण शिष्यवृती याबद्दल मार्गदर्शन केले.या परिषदेला हरपुडे गाव कमिटी अध्यक्ष पदमाकर कदम, सचिव अनंत घुग यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. ही परिषद यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक बने, पदवीधर शिक्षिका मुग्धा केळकर, शर्मिला बेटकर, स्वयंपाकी सुप्रिया गायकवाड, सुगंधा महाडिक, पालक सावंत, अंगणवाडी ताई महाडीक, बाईत, ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन मुग्धा केळकर व आभार सुनिल बोडेकर यांनी मानले.