सतीश तारेंसारखा दुसरा नट होणे नाही…”, वैभव तत्त्ववादीचे वक्तव्य चर्चेत, 

Spread the love

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून वैभव तत्ववादीला ओळखले जाते. ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, ‘व्हॉट्स अप लग्न’, ‘भेटली तू पुन्हा’ अशा अनेक चित्रपटातून त्याने अभिनयाचा ठसा उमटवला. सध्या तो त्याच्या तीन अडकून सीताराम या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच वैभव तत्त्ववादीने विनोदी अभिनेते व रंगकर्मी सतीश तारें बद्दल वक्तव्य केले आहे.

नुकतंच तीन अडकून सीताराम या चित्रपटाच्या निमित्ताने वैभव तत्त्ववादीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला तुझ्या दृष्टीने हास्य-विनोदाचा अचूक वेळ साधणारे कलाकार कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने विनोदी अभिनेते व रंगकर्मी सतीश तारे असे नाव घेतले.

“सतीश तारे हे फारच उत्कृष्ट अभिनेते होते. सतीश तारें सारखा दुसरा नट मी पाहिलाच नाही. मी शाळेत, कॉलेजमध्ये असताना त्यांची अनेक नाटक पाहिली आहेत. त्यांना ‘किंग ऑफ टायमिंग’ असंच म्हणायला हवं. त्यांच्यासारखा माणूस मी कुठेही पाहिला नाही”, असे वैभव तत्त्ववादी म्हणाला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page