पक्ष कोणताही असो! आमचा उमेदवार मराठी पाहिजे ; महाराष्ट्र संरक्षण संघटना

Spread the love

गिरगाव: मुंबईसह-महाराष्ट्र राज्यात परप्रांतीयांची दिवसेंदिवस वाढत चाललेली मुजोरी‌ याला आता कुठेतरी खिळ बसावी तसेच महाराष्ट्रातील सर्व स्थानिक राजकीय पक्षा-अंतर्गत वाढत चाललेले अमराठी (परप्रांतीय) उमेदवारांचे संख्याबळ म्हणजेच स्थानिक राजकीय पक्षात वाढती घुसखोरी त्याचेच फळीत म्हणून काय आताच्या घडीला आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत ८३+ अधिक अमराठी (परप्रांतीय) नगरसेवक, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत २५+ अधिक अमराठी (परप्रांतीय) आमदार आणि मंत्रिमंडळात अमराठी (परप्रांतीय) खासदार निवडून आले असून मराठी माणसांसाठी त्याचबरोबरीने महाराष्ट्र राज्यासाठी हे सर्व भविष्यात खुपच धोकादायक ठरणार आहे.

यासाठी बिगर राजकीय चळवळ असलेली मराठी भाषा जतन संवर्धन आणि संरक्षण यासाठी सदैव कटिबद्ध असलेली आपल्या मराठी माणसांची संघटना म्हणजे महाराष्ट्र संरक्षण संघटना रजि.यांच्या माध्यमातून व मुंबईसह-महाराष्ट्र वाचवा कृती समिती नोंदणीकृत यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील सर्व पक्ष-प्रमुखांना एक आवाहन व मराठी माणसांची मागणी म्हणून यापुढे पक्ष कोणताही असो आमचा उमेदवार मराठीच पाहिजे या कायदेशीर संविधानिक मागणीला अनुसरून मराठी माणसांमध्ये मतदारांमध्ये जनजागृती व्हावी या विचाराने रविवार दि.१ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ३वा.मराठी माणसांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे गिरगाव गायवाडी येथे सह्या मोहीम अभियान राबविण्यात आले असता गिरगावकरांनी १२२५ हून अधिक सह्या करून मोहिमेला उत्तम प्रतिसाद दिला.

पक्ष कोणताही असो आमचा उमेदवार मराठीच पाहिजे मोहिमेत महाराष्ट्र संरक्षण संघटनेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र संरक्षण संघटना रजि.),संलग्न मी मराठी एकीकरण समिती (नोंदणीकृत), मुंबईसह-महाराष्ट्र वाचवा कृती समिती नियोजित.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page