देवगड हापूस आंब्याचे ट्रक ओव्हरलोड दाखवून त्रास देण्याचा प्रयत्न आ. नितेश राणे यांनी घेतली दखल…

Spread the love

गडगडलेल्या हापूस आंबा दराबाबत घेतली दलालांची भेट..

सध्या सिंधुदूर्गात हापूस आंबा हंगाम जोरदार चालू आहे यातच देवगड तालुक्यासह शेकडो ट्रान्सपोर्ट वाहनाने आंबा वाहतूक मुंबई व इतर शहरात होत असते. मागील ३/४ दिवसात नवी मुंबई पोलिक ट्राफिक उपायुक्त यांच्या मनमानीचा फटका आंबा वाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्टला बसला ओव्हरलोडचे कारण दाखवून ठिकठिकाणी त्यांच्याकडून चलन फाडले जात होते त्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जायला लागे. नेमकी हीच बाब आमदार नितेशजी राणे यांच्या निदर्शनास संबंधितानी आणून त्यांनी तात्काळ नवी मुंबई पोलिक ट्राफिक उपायुक्त यांच्याशी चर्चा करून यावरती तोडगा काढला यावेळी उपायुक्त श्री काकडे यांनी आपला मोबाईल नंबर वरती काही समस्या असतील तर तात्काळ फोन करावा असे आवाहन केले आहे

तसेच सध्या हापूस आंब्याच्या गडगडलेल्या भावा संदर्भात शेतकरी हवालदिल झाले होते त्यामुळे ही बाब सुद्धा आमदार नितेशजींनी नवी मुंबई एपिएमसी मार्केट चे अध्यक्ष श्री संजय पानसरे आणि संपूर्ण आडत्यांशी संवाद साधून याबद्दल सुद्धा सकारात्मक चर्चा केली त्यामुळे आंबा भाव नक्कीच वधारेल यामुळे आंबा शेतकरी,व्यावसायिक, ट्रान्सपोर्टवाले नक्कीच समाधानी झाले आहेत

नवी मुंबई ट्राफिक उपायुक्त श्री काकडे यांचा संपर्क क्रमांक – ९१५८९१०१००

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page