मिस वर्ल्ड 2024 मध्ये नीता अंबानींची चर्चा, कारण काय?…

Spread the love

रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी मिस वर्ल्ड 2024 च्या अंतिम फेरीत आपल्या उपस्थितीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या कार्यक्रमात त्यांनी बनारसी साडी नेसली होती.

मुंबई – Nita Ambani Miss World 2024 : रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी मिस वर्ल्ड 2024 इव्हेंटमध्ये पारंपरिक बनारसी साडी नेसल्यामुळे चर्चेत आल्या आहे. स्वदेशी डिझाइन केलेल्या साडीचा प्रत्येक धागा सोकी झारी आणि रेशमपासून बनविण्यात आला आहे. नीता अंबानींच्या साडीवर सुंदर फुलांची जाळी, मीनाकारी नक्षी काळजीपूर्वक विणलेली आहे. त्यामुळे ती साडी खूप आकर्षक दिसत होती. ही साडी कुशल कारागीर मोहम्मद इस्लाम डिझाइननं केली आहे. अनेकदा मनीष मल्होत्रा​ हे भारतीय कलात्मकतेचे प्रतिनिधित्व आणि सुंदर कपड्याचे नेहमीच सादरीकरण करत असतात.

नीता अंबानींची बनारसी साडी…

नीता अंबानी यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कार देण्यात आला आहे. कार्यक्रमादरम्यान आपल्या भाषणात नीता अंबानी यांनी उपस्थित सर्व महिलांचं कौतुक केलं. नीतानं आपल्या भाषणात म्हटलं, ‘या सन्मानाबद्दल धन्यवाद. हा केवळ माझ्या एकट्याचा सन्मान नाही. तर आपल्या सर्वांना एकत्र बांधून ठेवणाऱ्या करुणा आणि सेवेच्या सामर्थ्याचा दाखला आहे. माझ्या संपूर्ण प्रवासात मला सत्यम, शिवम् आणि सुंदरम् या शाश्वत भारतीय तत्त्वांचे मार्गदर्शन मिळालं आहे. रिलायन्स फाऊंडेशनमध्ये, आम्ही प्रत्येक भारतीय विशेषत: महिला आणि तरुण मुलींना शिक्षण, आरोग्यसेवा, क्रीडा उपजीविका आणि कला आणि संस्कृतीच्या संवर्धनाद्वारे सक्षम करण्यासाठी समर्पित प्रयत्न करत आहोत. मी कृतज्ञतेनं आणि नम्रतेनं हा पुरस्कार स्वीकारते.”

मिस वर्ल्ड 2024 इव्हेंट…

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी येथे 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात क्रिती सेनॉन, पूजा हेगडे, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस हे उपस्थित होते. याशिवाय या कार्यक्रमात मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या चेअरपर्सन सीईओ ज्युलिया मोर्ले, स्ट्रॅटेजिक पार्टनर आणि होस्ट मिस वर्ल्ड इंडिया जमील सईदीसह मानुषी छिल्लर आणि तीन माजी मिस वर्ल्ड उपस्थित होत्या. माजी मिस वर्ल्ड मेगन यंग आणि चित्रपट निर्माता करण जोहरनं हा कार्यक्रम होस्ट केला होता. या कार्यक्रमात शान, टोनी कक्कर आणि नेहा कक्कर यांनी जबरदस्त परफॉर्मन्स दिला. शनिवारी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या 71व्या मिस वर्ल्ड फिनालेमध्ये नीता अंबानी यांना ‘ह्यूमैनिटेरियन अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आलं.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page