ना जिम, ना डायटिंग; फक्त हळदीचा असा करा वापर, पोटाची चरबी वितळेल सरसर…..

Spread the love

आजकाल धावत्या जीवनशैलीमुळे लोकांचे वजन झपाट्याने वाढताना दिसते. वाढत्या लठ्ठपणामुळे, वजनामुळे सकाळच्या व्यायामापासून ते आहारावर नियंत्रण मिळवण्यासाठी लोक चिंतेत असतात. हल्ली लोक वजन कमी करण्यासाठी काहीही करु शकतात. पण थंडीच्या दिवसांमध्ये वजन कमी करणे अवघड होऊन जाते. दिवसभर बसून कामे केल्याने आपोआपच वजन वाढते आणि पोटावर चरबीचा घेर वाढू लागतो.

काही केल्या जर वजन कमी होत नसेल तर अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपायही करून पाहावेत.

आज आम्ही तुम्हाला घरात सहज उपलब्ध असणाऱ्या हळदीचे फायदे सांगणार आहोत…

NCBI ने प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टनुसार वाढलेले वजन कमी करण्यासाठी हळदीचे पाणी फायदेशीर ठरते. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी नामक घटक आढळतात. शिवाय यामध्ये असणाऱ्या ‘करक्युमीन’मुळे शरीरातील फॅट सहज कमी होते असे तज्ञ सांगतात.

एका अध्ययनानुसार, वजन कमी करण्यासाठी ४४ लोकांवर केलेल्या यशस्वी प्रयोगामध्ये दिवसातून दोन वेळा हळदीचे सेवन केल्यास त्यांचा बीएमआय कमी होतानाचे आढळले. याशिवाय कमरेच्या खालील भागामधील चरबीदेखील कमी झाली.

हळदीमध्ये विटामीन सी, पोटॅशिअम, प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, लोह,कॉपर, झिंक, थायमिन तसेच राइबोफ्लेविन चे गुणधर्ण असतात. यामुळे त्वचेच्या विकारांपासून संरक्षण होते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी कच्ची हळद पाण्यामध्ये उकळून घ्यावी. हे मिश्रणयुक्त पाण्याचे रिकाम्या पोटी सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

कृती…
१. सुरुवातीला एका भांड्यात दोन ग्लास पाणी घ्यावे, ते पाणी गरम झाले की त्यात साफ केलेली कच्ची हळद टाकावी.

  • २. पातेंल्यात यात १ ग्लास पाणी शिल्लक राहिल इतके पाणी उकळु द्यावे. त्यानंतर हे हळदीचे पाणी गाळून घ्यावे.
  • ३. तज्ञांच्या सल्ल्यानुसार, रोज नियमितपणे हळदीचे पाणी न चुकता प्यावे, तुम्हालाही फरक जाणवेल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page