*नेरळ: सुमित क्षिरसागर –* नेरळची वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे,यामुळे येथील सर्वसामान्य नागरिक त्रासले असून व्यापारी वर्गात नाराजी आहे त्यातच शाळेतील विद्यार्थ्यांनसाठी देखील ही कोंडी त्रासदायक ठरत आहे.
नेरळ शहरात वाढत्या नागरिकरणा बरोबर नेरळ शहरात वाहतुकू कोंडीची समस्या जटिल होवून बसली आहे.नेरळ बाजारपेठ मध्ये अस्ताव्यस्त लावण्यात येणारी वाहने त्यामुळे बाजारपेठेत वाहतूक कोंडी होत आहे.येणाऱ्या नागरीक आणि शाळेतील विद्यार्थी आणि पर्यटक यांना ही मोठी डोकेदुखी ठरत चाली आहे. ऐन सणसुदीच्या दिवसात तरी पोलिस अधिकारी यांनी लक्ष देऊन बेशिस्त पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करून समस्या सोडवणे गरजेचे बनले आहे.परंतु पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नेरळ शहरात वाहतूक कोंडीची समस्या ही अधिकच जटिल होत गेली. दरम्यान वाहतूक कोंडी सोडावी म्हणून व्यापारी वर्गात मागणी जोर धरू लागली आहे.
मोठ्या गाड्या सणासुदीचां दिवसात बाजारात येणार नाही यावर व्यापारी वर्गाशी बोलून उपाय योजना करावी अशी मागणी समोर येत असून पोलीस प्रशासनाने यावर नियोजन करणे याची मागणी जोर धरू लागली आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाताना आणि येताना या मुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकी वाहनवांवर लावण्यात आलेल्या कर्कश सायलेन्सर मुळे होणाऱ्या त्रासामुळे नागरिकांचा आरोग्यावर परिणाम होत आहे.