पत्रकारिता आणि मानवी हक्क कोर्स ऍडमिशन प्रक्रियेला १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ…

Spread the love

रत्नागिरी, दि. ०१ (प्रतिनिधी): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत सुरु असणाऱ्या पत्रकारिता पदविका (Diploma in Journalism) आणि मानवी हक्क (Human Right) शिक्षणक्रम या अभ्याक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला १ जुलै २०२४ पासून सुरु झाले होते. याची ऍडमिशन मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत होती.
राज्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या कोर्सना प्रवेश घेता आला नव्हता, कोणता हि विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आज रोजी विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयामध्ये पत्रकारिता आणि मानवी हक्क अभ्याक्रमाच्या प्रवेशाला दिनांक १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. या सर्व कोर्सेचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या वेबसाईट
(https://ycmo.digitaluniversity.ac) वर सुरु असणार आहेत.

पत्रकारिता (Journalism) क्षेत्रात उपयुक्त असणारा पत्रकारिता पदविका आणि सामाजिक क्षेत्रात उपयुक्त मानवी हक्क शिक्षणक्रम या कोर्सचे प्रवेश रत्नागिरीतील विद्यापीठाचे अधिकृत अभ्यासकेंद्र रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिटयूट येथे या शिक्षणक्रमांचे प्रवेश सुरु आहेत.

पत्रकार होण्यासाठी उपयुक्त असणारा पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम हा १२ वी उत्तीर्ण, १२ वी समकक्ष कोणताही शासनमान्य कोर्स तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्याना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल. तसेच मानवी हक्क शिक्षणक्रमासाठी १० वी उत्तीर्ण तसेच १० वी समकक्ष कोणताही शासनमान्य कोर्स तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्याना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल. तसेच बी.एड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे दोन्ही कोर्स केल्यानंतर ७ गुणांचे भारांक मिळणार आहे.

या कोर्सेच्या प्रवेशप्रक्रिया संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी मुक्त विद्यापीठाचे अधिकृत अभ्यासकेंद्र रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिटयूट, ३/२०८, रत्नभूमी बिल्डिंग, पत्रकार कॉलनी, रेल्वे स्टेशनसमोर, कुवारबाव, रत्नागिरी संपर्क क्र. ९७६३०४७७८७, ९६०७८०९३४३, ९९२१८७९६६० येथे संपर्क साधावा.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page