नवरात्र उत्सवातील दुर्गादेवी स्त्री शक्तीच्या प्रेरणादायी, नेतृत्ववान, गुणांकडे झेप घेणाऱ्या महिला. !
कर्तव्यदक्ष सायबर गुन्हा शाखेच्या, पोलीस निरीक्षक -स्मिता सुतार!
श्रीकृष्ण खातू/धामणी /संगमेश्वर- आपले कर्तव्य जाणणारी व नेमाने कर्तव्य पार पाडणारी महाराष्ट्र पोलीस दलातील प्रत्येक महिला पोलीस, म्हणजे नारी शक्तीरुपी तेजस्वी ,नवरात्र उत्सवातील नवदुर्गा ,व मानवातील दुर्जन महिषा सुराचे मर्दन करण्याचे बळ प्राप्त करून ,अशाच स्त्रिया विविध क्षेत्रात पादाक्रांत करून कार्याचा ठसा सर्वच क्षेत्रात उमटवला आहे. व उमटवत आहेत. अशाच एक चौकटी बाहेरचे क्षेत्र निवडून कर्तुत्वाकडे वाटचाल करणाऱ्या एक कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय सायबर गुन्हे शाखा मुख्यालय रत्नागिरीच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार!
स्मिता सुतार यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कर्नाळ खेडेगावात अगदी गरीब कुटुंबात झाला. वडील फर्निचर सुतार काम करतात. तर आई गृहिणी आहे. एक भाऊ सध्या व्यवसाय करतात. कर्नाळ येथे दहावीपर्यंत व मिरज येथे बी.एस.सी पदवीधर शिक्षण घेतले. बालपणातील शिक्षण घेत असताना आजोबा( आईचे वरील) भारतीय सैनिकांमध्ये सेवा करत होते. त्यांनी आपल्या नातीला अगदी लहानपणीच तू पण सैनिकांमध्ये भरती हो.व देशाची सेवा कर. स्त्रियांनी पण अशा क्षेत्राकडे वळले पाहिजे. चौकटीच्या बाहेर जाऊन बिनधास्तपणे वावरले पाहिजे. अशा प्रकारचे प्रोत्साहन व चेतना देण्याचा प्रयत्न केला.तेव्हा स्मिता यांना मैदानी खेळ ,हाॅलीबॉल,कबड्डी, धावणे,लांब उडी,अशा खेळांची आवड असल्याने आजोबांनी आपली नात काटक असल्याचे ओळखले होतें. आजोबांच्या प्रोत्सानाने स्मिता यांनी भारतीय सैनिक होण्याचे ठरवले. परंतु किंचित थोड्या उंचीच्या समस्येमुळे संधी मिळाली नाही.
बी.एस.सी.शिक्षण २००४ मध्ये पूर्ण केल्यानंतर आपण हार्ड वर्क करण्याचे ठरवले होते.त्याच दरम्यान एम.पी.एस.सी.ची जाहिरात आली.५०% पोस्ट पी.एस.आय आर्ट शाखेसाठी व ५०% टक्के सायन्स शाखेसाठी होत्या.त्या प्रमाणे अर्ज केला.
२००४/०५ मध्ये फिजिकल परीक्षा दिली.व त्या सरावामुळे शरीर मजबूत बनविले. आजोळी लहानाची मोठी झाल्याने ,मुलगी म्हणून वावरत असतांना तो करतो,मग मी का करू नये? त्याला जमते,मग मला का नाही जमणार? अशा प्रत्येक विचाराने अवघड गोष्टी करण्यासाठी मन स्वतः तयार केले.
भारतीय सैनिक भरतीतील गेलेली संधीची तीच इच्छा, व जिद्द, मनाशी ठेवून बीएससी शिक्षण पूर्ण झाल्यावर, एम. पी. एस.सी. चे शिक्षण सुरू करून २००६ मध्ये परीक्षा दिली.व ट्रेनिंग साठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे जाऊन, एक वर्ष कालावधीचं ट्रेनिंग पूर्ण केले . त्यानंतर २००७ मध्ये पुणे शहर आयुक्तालय येथे पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून रुजू झाल्या. तेथे साधारण सहा वर्षाच्या सेवेत दोन बदल्या झाल्या. नंतर पुणेहून कोल्हापूर येथे पोलीस सहाय्यक निरीक्षक म्हणून बदली झाली. कोल्हापूरला२०१४ ते. २०१८ पर्यंत सेवा करून कोल्हापूरहून २०१८ मध्ये सोलापूर शहर आयुक्तालय येथे बदली होऊन २०१९ पर्यंत कार्यरत होत्या . २०१९ मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. त्यानंतर २०१९ ते २०२३ पर्यंत चार वर्षे पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे सेवा बजावली. तिथून रत्नागिरी जिल्ह्यात सायबर गुन्हे शाखेत बदली झाली. त्याचदरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी फेब्रुवारी २०२४ मध्ये संगमेश्वर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक म्हणून हजर होऊन, तेथे पाच महिने सेवा बजावून सायबर गुना शाखा मुख्यालय रत्नागिरी येथे पुन्हा रुजू झाल्या.
महिला पोलिसांचा उपयोग प्रामुख्याने अल्पवयीन गुन्हेगारांना पकडणे, गुन्ह्याचा शोध व चौकशी करणे, संशयित स्त्री व्यक्तीवर लक्ष ठेवणे, तसेच लैंगिक गुन्हे, छळवणूक, हुंडाबळी, अपहरण उघडकीस आणणे , इत्यादी कामांसाठी जास्तीत उपयोग होतो. ही कामे महाराष्ट्र पोलिस पुरुषांप्रमाणे स्त्रिया सुद्धा परिणामकारकरित्या करतात.पोलीस दलात पदार्पण करावे , असे विचार अलीकडे काळात जास्त ऐकायला मिळतात.
अनुभव सांगताना म्हणाल्या छोटे बाळ हरवले असेल, किंवा महिला अत्याचार असेल, त्यावेळी मी पोलीस म्हणून निर्भीडपणे योग्य कारवाही केली आहे. एका क्रीडा शिक्षकाने चार मुलींना दिलेला त्रास त्यासाठी एफ, आय ,आर ,नोंदवून चांगला सखोल तपास करून आजन्म कारावासाची शिक्षा झाली आहे. त्यामुळे त्री म्हणून केलेल्या योग्य कामाचे समाधान मिळते. सोनोग्राफीचे मशीन गर्भलिंग निदान करण्यासाठी कायद्याने बंदी असल्याने काही डॉक्टर दवाखान्यात न करता ,गाडीतच डॉक्टर ऑपरेट करायचे, अशी तक्रार आल्यानंतर सखोल तपास करून त्या डॉक्टर व त्यांच्या स्टाफला योग्य शिक्षा करण्यात आली.
संगमेश्वर पोलीस स्टेशनला रुजू झाल्यानंतर शिमगोत्सवात अनेक वर्षाचे असणारे वाद, सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केले. सुमारे दहा-बारा वर्षाचे असणारे संगमेश्वर तालुक्यातील काही गावातील वाद,तंटे,सोडवून त्या लोकांचा आनंद लोकांना मिळवून देण्यात स्मिता सुतार यशस्वी झाल्या.त्यातून आपल्या कामाची चुणूक दाखवली. व तेथील लोकं या मुळे खूप समाधानी झाले.शिमगा सणासाठी मुंबई हून चाकरमानी गावाला आलेले शिमगा सण करून पुन्हा मुंबईला जातांना संगमेश्वर पोलीस स्टेशनला येऊन आभार मानून व पेढे देऊन गेले.त्यामुळे एक स्त्री म्हणून निर्णायक न्याय मिळवून देण्याचे काम करतांना खूप समाधान वाटले.अशा अनुभवाने आणखी आत्मविश्वास नक्कीच वाढला.
लहानपणीचे विचार माॅडर्न होते. हे मी का करायचे नाही? हा उलगडा आपल्या वागण्याने केला. म्हणून महिलांनी न घाबरता समाजात येऊन लोकांबरोबर वावरले पाहिजे .आपले कर्तुत्व सिद्ध करून दाखवले पाहिजे. कोणती स्त्री कमी नाही . लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये अगदी काटेकोरपणे नियोजन करून ,कोणताही प्रकार न घडता ,पोलीस म्हणून आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने काम उत्तम पार पाडले. हा महिला म्हणून त्यांचा पहिलाच अनुभव होता.
आज जेथे जेथे सेवा केली आहे ,तेथील ओळखीचे लोक आजही फोन करून चौकशी करतात. तितकीच भीती, तितकीच शिस्त , तेवढाच धाक, व तेवढीच माणुसकी, यामुळे खूप माणसे जोडली गेली असून, पोलीस स्टेशनच्या कामात आमचा स्टाफ व येथील लोकं, खूप सहकार्य करतात .म्हणूनच मी निर्भिडपणे महिला पोलीस म्हणून यशस्वी होत आहे.
समाजातील अनेक महिलांनी शारीरिक व परिस्थीतीची अडचण न सांगता ,भिती न बाळगता,अशा प्रकारे सकारात्मतेने न घाबरता समाजात चांगले काम केले पाहिजे, त्यासाठी मात्र पाहिजे मानसिकता व हवा मोठा आत्मविश्वास!
▪️लेख शब्दांकन……
▪️श्रीकृष्ण खातू /धामणी /संगमेश्वर-मोबा.नं.८४१२००८९०९