संगमेश्वर – वार्ताहर/दिनेश अंब्रे- संगमेश्वर नावडी येथील श्री निनानी देवी प्रसादिक मंडळाच्या वतीने सपंन्न होत असणारा नवरात्रौ उत्सव अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला आहे.मंदिरात श्री विठलाई, श्री निनावी, श्री वरदानी वाघजाई आणि देवी श्री मानाई अशी देवीची रूपे स्थानापन्न केलेली आहे. या देवीच्या दर्शनाला येणाऱ्या सर्व भक्तांना ऊर्जा,शक्ती, प्रेरणा, उत्साह, शौर्य व संपन्नता या निमित्ताने प्राप्त होत असतात. श्री निनावी देवी प्रसादिक मंडळाचे अध्यक्ष श्री दत्ताराम सुर्वे.(बावा सुर्वे, खोत) यांच्या अध्यक्षेतेखाली उत्सव प्रतिवर्षी चालत असतो.
हा उत्सव प्रतीपदेपासून दसऱ्यापर्यंत साजरा होत असतो. माहेरवाशीणी नवस फेडायला व ओट्या भरायला विविध गावातून येत असतात. भक्तजनांना नवरात्रौत्सवाचे पर्व ऊर्जा, उत्साह, ऐश्वर्य, शौर्य व आनंद देणारे असते.
https://youtu.be/4MNeLc3DBIM?si=TgW15cgcN2uBHBQF
विविध गावातून भक्तगण येऊन आपली भजन व गायन, तबला वादन आदि सेवा करत असतात. सात दिवस सात गटांच्यावतीने भजन रुपी सेवा, अखंड हरिनाम मंदिरात केले जाते. विविध कलाकार येऊन कलेचे सादरीकरण करत असतात. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने भक्तांचा आनंद द्विगुणित होतो.
मंदिराच्या गाभाऱ्यात तसेच आत व बाहेरील गेटपासून प्रागंणात दिपमाळांची सजावट व रोषणाई केल्यामुळे निनावी देवी मंदिराला दिव्य व चैतन्यमय आगळे वेगळे रूप प्राप्त झाले आहे. या दैदिप्यमान प्रकाशाने मंदिर उजळून निघाले आहे.
https://youtu.be/4MNeLc3DBIM?si=ieXxE4o9ajvhfxSE
रात्रौ १० वाजता महाआरती व रात्रौ १२ नंतर विविध जिल्ह्यातुन आलेले डबलबारीचे कार्यक्रम व भजने संपन्न होतात.
संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.अमित यादव व पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे यांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभत आहे.