नवरात्र विशेष लेख!…दुसरा दिवस!समाज कार्यकर्त्या – माधवी भिडे वहिनी !…   

Spread the love

नवरात्रों उत्सवातील दूर्गा देवी स्त्रीशक्तीच्या प्रेरणादायी ,नेतृत्वान, कर्तृत्वान, गुणांकडे झेप घेणाऱ्या  महिला !

समाज कार्यकर्त्या …….माधवी भिडे वहिनी !

श्रीकृष्ण खातू /धामणी /संगमेश्वर- सद्ध्या चालू असलेला “नवरात्र” उत्सवाचा काळ चालू आहे. हा उत्सव प्रामुख्याने दूर्गा देवी, महालक्ष्मी,शारदा देवी अशा स्त्रीशक्ती देवतांचा आदर भावाने उत्सव केला जातो. अशा स्त्री शक्ती  देवतांनी आपल्या महान शक्तीने असंख्य चांगल्या गोष्टी केलेल्या सर्वाना ज्ञात आहेत ‌.अशा स्त्री आदर्शाची,कर्तृत्वान व नेतृत्वान महिलांची इतर  अलिकडील  महिलांना प्रेरणा  मिळून स्त्री शक्ती जागृत व अद्यावत ठेवून सकारात्मकता जोपासून इतर महिलांना नक्कीच  प्रोत्साहन मिळेल अशी एक प्रामाणिक व मनस्वी इच्छा!


             
आज कोणतीही स्त्री स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचे निर्णय स्वतःच घेण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहे. वाटचालीत स्त्रियांची सहनशक्ती,सुज्ञपणा, भवितव्यावरील अढळ निष्ठा व त्याग करण्याची तयारी असलेली आजच्या स्त्री बाबत इतर भगिनींना त्याची जाणीव होऊन, अशा स्त्रीप्रमाणे पुरूषांच्या बरोबरीने सक्रीयपणे भूमिका बजावणे,व सामाजिक अन्याय,चालीरीती, सांस्कृतिक व सेवाभावी प्रगतीच्या इतर क्षेत्रांकडे वळून,व त्यातून समाजासाठी खारीचा वाटा म्हणून काही उचलता येऊ शकेल का? या मानसिकतेतून आपले कुटुंब म्हणजे संसार व व्यवस्थितपणे.   सांभाळून कुटुंबातील सदस्यांच्या  सहमताने  स्त्रियांनी समाज,गरजू महिलां,निराधार मुले यासाठी काही तरी  महिलांनी कुवतीप्रमाणे करावे,अशी इच्छा जोर धरू लागली आहे.

     
अशाच मानसिकतेच्या, लहानपणापासूनच आपल्या आईवडिलांनी केलेल्या संस्कारामुळे सासरी सुद्धा उत्तम व पोषक वातावरण प्राप्त झाल्याने संगमेश्वरातील सर्वांच्या सुपरिचीत,कुटुंब वत्सल, प्रसंगी आपल्या भगिनींना व मैत्रिणींनी.   मदत करणाऱ्या, तसेच गेली सुमारे ३५वर्षे महिला दक्षता समितीवर प्रामाणिकपणे काम करून पिडीत महिलांना योग्य न्याय मिळवून देणाऱ्या ,सामाजिक कार्यकर्त्या,संगमेश्वर पंचक्रोशीतील तमाम बंधूभगिनींच्या मानलेल्या भिडे वहिनी!

           
मध्यम परिस्थितिमध्ये दि.२७/०२/१९५५ रोजी जन्मलेल्या, व कासारवेली  माहेर असलेल्या शकुंतला विष्णू केळकर  आताच्या माधवी मनोहर भिडे यांचे बालपण तेथेच झाले.प्राथमिक शिक्षण बसणी येथे व पुढील शिक्षण रत्नागिरी येथे झाले.

लहानपणापासून बापूसाहेब परूळेकरांच्या मार्गदर्शनामुळे समाजात वावरणे,समन्वय ठेवणे,कुटुंबात कष्ट करणे, गरजू व इतरांच्या  आवश्यक गोष्टीकडे एक कर्तव्य समजून लक्ष देणे असे गुण जोपासत असतांना वयाच्या बावीसाव्या वर्षी संगमेश्वर येथील प्रतिष्ठीत व्यापारी व सेवाभावी
अप्पा भिडे यांचे चिरंजीव मनोहर भिडे यांच्याशी विवाह झाला.  त्यानंतर तीन,चार वर्षे सासरे अप्पा भिडे यांची शिकवण व पती यांची उत्तम साथ  मिळाली.

      
त्यानंतर दोन मुलगे व दोन मुली अपत्य शिकत असताना त्यांना  संस्कार  व अभ्यास याकडे लक्ष देण्याचं करत असताना  १९९६ साली पती़च्या अपघातामुळे संघर्ष करावा लागला. तरीही माझी जिद्द किंवा धडपड बघून ग्रा.पं. सदस्य मी व्हावे कुटुंबाला वाटत असतांना सासर्यांच्या प्रेरणेने तत्कालीन संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक दिवाकर सावंत यांच्या कारकीर्दीत १९८८ साली महिला दक्षता समितीवर सदस्या म्हणून माझी निवड झाली. या सदस्यरूपी नेतनेतृत्वामुळे पोलीस स्टेशनला कामानिमीत्त जाणे,येणे व महिलाच्या  तक्रारींना चर्चा करून योग्य न्याय देऊन अशा गोष्टीं निर्णायक वृत्तीने सहिसलामत सोडवून महिलांचा त्रास कमी करणे,या गोष्टींना प्रामुख्याने लक्षात केंद्रीत केल्याने आजपर्यंत  सुमारे ३५वर्षे महिला दक्षता समितीवर एक प्रभावी कार्यकर्ती  म्हणून पोलीस स्टेशनला परिचित असून,अजून सुद्धा त्याच उमेदीने कार्य करतांना दिसतात.

       
फार वर्षापूर्वी प्रामुख्याने संगमेश्वर बाजारात जी वस्तू किंव माल मिळत नव्हत्या, त्याच वस्तू मालाची उपलब्धता करून व्यवसाय सुरू कराव हा हेतू सासरे अप्पा भिडे  यांचा असल्याने प्रथम कौलांचा व्यवसाय सुरू झाला‌.त्यावेळी  ही कौले नदीच्या मार्गाने मचवा, जहाज, लॅॉच यांच्या सहाय्याने येत असत.त्यावेळी पती मनोहर  भिडे
यांनीही  या व्यवसायात भरारी घेऊन कौले,सिमेंट, लोखंड,पत्रा,खिडक्या,दरवाजे,चुली,खडी,वाळू अशा मालाचे एक परीपूर्ण हार्डवेअरींग व्यवसाय अद्यावत करून आज आपले पूत्र उपेंद्र व ओंमकार यांच्या हाती देऊन उत्तम प्रकारे चालू असून, यासाठी गिऱ्हाईक असो वा कामगार माणसं असोत त्यांना गरजेला,प्रसंगाला जेवण,कधी चहापाणी,अशा व्यवस्था करण्यासाठी भिडे वहिनी कधीही कंटाळलेल्या नाहीत.म्हणजे पती व मुलांच्या व्यवसायात सुद्धा एक स्त्री म्हणून नक्कीच खारीचा वाटा उचलला आहे, असे म्हटल्यास वावगे नाही.

         
निसंकोच व मदत याचं एक उदाहरण म्हणजे संगमेश्वर ते रत्नागीरी असा प्रवास करत असता,पैसा फंड हायस्कुलच्या एका विद्यार्थीनीचा एसटी प्रवासाचा पास काढत असताना  खिडकीतून बाहेर गेला. कंडक्टरंना  गाडी थांबवा अशी विनंती केली.परंतु ते गाडी थांबवायला तयार नव्हते.वाद सुरू झाला.विद्यार्थीनी खूप गोंधळली व घाबरली.

कंडक्टर ऐकायला तयार नाहीत हे ओळखून स्वतः भिडे वहिनींनी बेल दिली व गाडी थांबवण्याची ड्रायव्हरला विनंती करून गाडी थांबवून त्या मुलीचा प्रवास पास मिळवून दिला.व पुढे ऑफिसला जावून अधिकारी वर्गाकडून कंडक्टरला योग्य समज दिली.

       
सन २००९ते२०१६. या काळात स्वतः सुगम संगीत विशारद होऊन संगमेश्वर येथील प्रियदर्शनी महिला भजन मंडळात  महिलांना भजन गायन , विविध अभंग,गजर,़इतर गायन कसे करावे ,अशा प्रकारचे शास्त्रशुध्द सुगम संगीत गायनाचे मार्गदर्शन मोफत या मंडळातील महिलांना करतात.समाज सेवा, कुटुंब वत्सलता,योग्य संसार, आपण महिला घरा बाहेर पडलो तरी आपल्या कुटुंबाकडे आस्थेने  खूप लक्ष  ठेवून म्हणजे कुटुंब सांभाळूणच,सामाजिक वृत्ती जोपासूया ,हा मंत्र महिलांना भिडे वहिनी आवर्जून देतात.त्यामुळें प्रियदर्शनी मंडळात खरंच महिलांच्या त्या नेहमीच प्रिय आहेत.

    
कोवीड १९च्या काळात सुद्धा गरजूंना आवश्यक मदत,पोलीस स्टेशनला लागेल ती मदत,यासाठी सातत्यपणा राखून दरमहाच्या भेटीतून अनेक गोष्टींकडे सकारात्मकतेने बघून निर्णायक बाजूने सोडवण्याचा मनस्वी प्रयत्न केला. यासाठी घरातील सूनां संगिता व अनया यांचे उत्तम सहकार्य मिळत असून त्यांचेही भिडे वहिनी कौतुक करतात.

       
रोजच्या कामातून बदल म्हणून कधी कधी  शाळा,हायस्कुल,मध्ये जावून  मुलांना संस्काराचे मार्गदर्शन करतात.व तेथेही विचारपुस करतात.
तसेच शेतीची ही आवड असल्याने आपल्या शेत जमिनीत दोन्ही सुनांना  प्रेरणा देऊन मार्गदर्शन करून कोकण मेवा रूपाने विक्रीसाठी  हंगामी स्टाॅल  मांडले जातात.भात शेती,आंबा,काजू,इत्यादींसाठी कष्टाची कामे सुना मार्गदर्शनाने करत असतात.

     
श्रेय- आपले सासरे अप्पा भिडे, पती मनोहर भिडे,  नणंद ललिता वसंत दामले (पुष्पा भिडे) यांनी विशेषतः महिलेने संघर्ष कसा करावा.याचे उत्तम धडे दिले.

🔹️प्राप्त पुरस्कार-

▪️१)विश्व समता आदर्श महिला राज्य स्तरीय पुरस्कार !
              
▪️२)अखिल भारतीय ब्राह्मण सेवा संघ आदर्श महिला पुरस्कार !
                 
▪️३)जिजाऊ माता प्रेरणा पुरस्कार!

🔹️लेख शब्दांकन…….

▪️श्रीकृष्ण खातू, धामणी /संगमेश्वर-मो.नं.८४१२००८९०९

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page