नवनीत राणा यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट…

Spread the love

अमरावतीच्या भाजपा उमेदवार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. भाजपानं अमरावतीमधून नवनीत राणा यांना तिकीट दिल्यानं महायुतीत वाद सुरू झाले.

नवी दिल्ली/मुंबई – देशभरात सध्या निवडणुकांचं वारं वाहतंय. उमेदवारीवरुन महायुती असो किंवा महाविकास आघाडी या दोघांमध्येही मतभेद असल्याचं दिसून आलं. यात अमरावतीची जागा हॉट स्पॉट झालीय. त्यातच शुक्रवारी भाजपा उमेदवार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

अमरावतीमध्ये बंडोबा…

अमरावतीच्या जागेववरुन महायुतीमध्ये वाद असल्याचं समोर आलं होतं. शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांना किंवा त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र, भाजपानं नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आणि अमरावतीमध्ये बंडाचं राजकारण सुरू झालं. अभिजीत अडसूळ यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवणार असल्याची घोषणा गुरुवारी केली होती.

राणा यांच्याविरोधात सर्व एकत्र…

2019 मध्ये नवनीत राणा या राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या मदतीनं निवडूण आल्या होत्या. त्यानंतर राणा यांची विधानं ही भाजपाला पूरक होती. त्यामुळं भाजपानं 2024 च्या लोकसभेसाठी नवनीत राणा यांना थेट अमरावतीमधूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. त्यामुळं स्थानिक शिवसेनेचे नेते नाराज झाले. अभिजीत अडसूळ, आमदार बच्चू कडू यांनी तर थेट नवनीत राणा यांचा प्रचार करण्यास नकारच दिलाय. त्यामुळं महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page