नेरळ मध्ये तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी…..

Spread the love

नेरळ: सुमित क्षीरसागर – शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून नेरळमध्ये बुधवार रोजी शिवचरित्रावर आधारित भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धेत लहान गटा मध्ये ओम पाटील- प्रथम, स्पृहा सावंत- दुसरी, प्रतीक भारती- तिसरा, तर
मोठ्या गटात श्रुती गुप्ता-प्रथम, सविता भारती-दुसरी,अनुराधा कांबळे-तिसरी, तसेच विकी कांबळे, अखिल तांबोळी, निलेश थॉमरे आणि यूवांश पवार यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आले.

शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून नेरळमध्ये राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शेकडो शिवभक्तांनी सहभाग घेतला होता. तर यंदा आचारसंहिता असताना देखील ढोल, ताशा, घोडे, बैलगाडी, विविध वेशभूषा अश्या शाही थाटात मिरवणूक शहरभरातून काढण्यात आली.

नेरळ येथील शिवजयंती सोहळ्याला ५० वर्षाहून अधिकची परंपरा आहे. यंदा निवडणुकांचे वर्ष असल्याने आचारसंहिता सुरू आहे. मात्र परंपरा आणि पावित्र्य जपत शिवजयंती उत्सव समिती नेरळच्या माध्यमातून शहरात शिवजन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. यंदा कुलाबा किल्ला येथून शिवज्योत आणण्यात आली. तर चेडोबा मैदान येथे सकाळी शिवरायांची पूजा करण्यात आली. यानंतर सायंकाळी नेरळ जकात नाका येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. यामध्ये शिवराय यासह त्यांचे मावळे अशी वेशभूषा देखील नेरळकरानी साकारली होती. ही मिरवणूक पुढे हेटकरआळी मार्गे पाडा, अंबिका नाका, बाजारपेठ करून जयहिंद नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जुनी बाजारपेठ ते पुन्हा चेडोबा मैदान येथे सांगता करण्यात आली. या मिरवणुकीत घोडे, बैलगाडी, ढोल ताशे, डिजे, मल्लखांब, भजन, कीर्तन यामध्ये पार पडली तर शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, शिंदे गटाचे युवानेते प्रसाद थोरवे यांनी देखील मिरवणुकीत हजेरी लावली. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी डी. डी. टेळे, नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे, पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक, लिंगप्पा सर्गळ, समीर लोंढे यासह पोलीस कर्मचारी तैनात होते.

यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष चेतन गुरव, उपाध्यक्ष संतोष धुळे, ओमकार लगड, सचिव कल्पेश खडे, सहसचिव संदीप उत्तेकर, खजिनदार विनोद डबरे, सहखजिनदार केवळ दहीवलिकर यासह इतर पदाधिकारी सल्लागार मंडळ यांनी मेहनत घेतली तर या मिरवणुकीत महिला, मुलांसह हजारो नेरळकर सहभागी झाले होते.

शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात विनोदवीर भाऊ कदम यांचे गाजलेले नाटक करून गेलो गाव…नाटक प्रेमींन साठी खास आयोजन सायंकाळी 6 वाजता.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page