यापुढे भाजपचाच खासदार, तुम्हाला संधी नाही; नारायण राणेंचा विनायक राऊतांना इशारा…

Spread the love

यापुढे भाजपचाच खासदार, तुम्हाला संधी नाही; नारायण राणेंचा विनायक राऊतांना इशारा..

कुडाळ : यापुढे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचाच खासदार असेल. परत तुम्हाला संधी नाही, असं आम्ही ठरवलं आहे, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी कुडाळ येथे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना दिला. तसेच कोरोना काळात उद्धवसेनेच्या नेत्यांनी मुंबई महापालिकेत औषधाचा घोटाळा केला आहे. याप्रकरणी लवकरच दोघेही पिता-पुत्र जेलमध्ये जातील, असा टोलाही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना लगावला.कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात बुधवारी भाजपाची संघटनात्मक बैठक झाली. यावेळी राज्याचे बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, प्रमोद जठार, बाळ माने, राजन तेली, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, रणजित देसाई, दत्ता सामंत, संघटक शैलेश दळवी, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, राजू राऊळ, अशोक सावंत तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राणे म्हणाले, या खासदाराने आतापर्यंत काय विकासाची कामे केली, हे जाहीर करावे. इथल्या स्थानिक आमदारानेही १० वर्षात विकासाच्या दृष्टीने शून्य काम केले. फक्त नारायण राणे, नीलेश राणे, नितेश राणे यांच्यावर तोंडसुख घेणे, त्यांच्यावर टीका करणे हे त्यांचे काम आहे. आता मी आलोय, आमच्याबद्दल घाणेरडा बोलता, कौतुक नाही तर बोलू नका, यापुढे असं बोलला तर मीसुद्धा जशास तसे उत्तर देईन, असा इशाराही राणे यांनी दिला. माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रणजीत देसाई यांनी केले, तर आभार जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मानले.

पुढील ३५ दिवस २४ तास प्रचार..

सिंधुदुर्ग जिल्हावासीयांचा निर्धार, पुन्हा एकदा मोदी सरकार- रवींद्र चव्हाण..

आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात देशात एनडीए ४०० पार आणि महाराष्ट्रात महायुती ४५ पार हे ध्येय गाठायचे आहे. यासाठी प्रत्येक मतदार महत्त्वाचा आहे. आपण आज एनडीएला जे मत देत आहोत, त्यातून आपलं आणि आपल्या मुलाबाळांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे; हे प्रत्येक मतदाराला पटवून द्या. यातून आपला विजय बुलंद होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-मालवण, सावंतवाडी-वेंगुर्ला, कणकवली-देवगड या तीन विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या विधानसभा वॉरिअर्स, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख आणि पदाधिकारी यांची संघटनात्मक आढावा बैठक आज कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे पार पडली. या बैठकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीचाच विजय झाला पाहिजे. यासाठी पुढचे काही दिवस देशाच्या विकासाला आणि आपल्या उज्ज्वल भविष्याला देत आहोत असे समजा आणि सर्वांनी एकत्र येऊन निवडणुकीचे काम करा. असे आवाहनही रवींद्र चव्हाण साहेब यांनी केले .

करायावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, अबकी बार ४०४. देशाला नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हवे आहे, हे गावागावात घराघरात जाऊन सांगा. त्यांनी जे काम केले त्या दिशेने जाणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी निवडणूक स्वतःच्या खांद्यावर घ्यावी. भाजपचा खासदार जिंकून येण्यासाठी इथून पुढे ३५ दिवस २४ तास प्रचार करा. बुथवर एनडीएच्या उमेदवारासाठी ८० टक्के मतदान मिळण्यासाठी प्रयत्न करा. विरोधकांना मतदान मिळणार नाही हे पटवून द्या.

निवडणुकीत गालबोट लागू देऊ नका…

आमदार नितेश राणे यांनी आपला खासदार निवडून येण्यासाठी रणनीती तयार करा. नमस्कार चमत्कार करा, साम-दाम-दंड-भेद नीती अवलंबून निवडणुकीत गालबोट लागू देऊ नका. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी काम करा. नीलेश राणे यांनी विद्यमान खासदार यांनी काय केलं याचा पाढा वाचा, चर्चा करा आपली दहा वर्षे फुकट गेली. विद्यमान खासदार काय करू शकले नाहीत आपल्याला संसदेत प्रश्न मांडणारा, बोलणारा खासदार पाठवायचा आहे, हे पटवून देण्याचे आवाहन केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page