शहरातील प्रभाग ३ व १४ मध्ये महायुतीच्या प्रचाराचा दणक्यात शुभारंभ…
▪️रत्नागिरी : शहरामध्ये प्रभाग क्रमांक तीन येथे आज रविवारी सायंकाळी सहा वाजता महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटला. आरोग्य मंदिर येथील श्री दत्त मंदिरात भाजपचे लोकसभा सहभागी बाळासाहेब माने यांनी श्रीफळ वाढवून प्रचार सुरू केला.
▪️केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार असून त्यांच्या प्रचारासाठी रत्नागिरी शहरामध्ये महायुतीतर्फे एकत्रित प्रचार करण्यात येत आहे. रत्नागिरी शहराच्या सर्वच्या सर्व 15 प्रभागांमध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा महायुतीतील सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचार सुरू केला आहे.
▪️प्रचाराची पत्रके सर्व प्रथम ज्येष्ठ नागरिक कट्टा येथील प्रभागातील नागरिकांना वाटून आणि मतदारांना आवाहन सात में रोजी जास्तीत जास्त मतदान करण्यास यावे, असे सांगण्यात येत आहे.
▪️प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी बाळ माने, शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, राजेश्वरी शेट्ये, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, नगरसेवक
उमेश कुळकर्णी, बूथ प्रमुख प्रविण देसाई, शिवसेना विभाग प्रमुख रूपेश पेडणेकर, उपविभाग प्रमुख सुनील शिवलकर, युवा नेते प्रसाद शेट्ये, पूजा दिपक पवार, दिव्या कामतेकर, तुषार देसाई, कुमारी शिवानी राजेश सावंत, प्रसाद बाष्टे, राजू बने,मनसे चे हसम नेवरेकर यांच्यासह शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मनसे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभाग १४ येथेही महायुतीचा प्रचार सुरू..
▪️शहरामध्ये प्रभाग क्रमांक १४ येथे आज रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटला.
▪️ घुडे वठार मंदिरात विलास विलणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराला प्रारंभ.
▪️केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार असून त्यांच्या प्रचारासाठी रत्नागिरी शहरामध्ये महायुतीतर्फे एकत्रित प्रचार करण्यात येत आहे.
▪️रत्नागिरी शहराच्या सर्वच्या सर्व 15 प्रभागांमध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा महायुतीतील सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचार सुरू केला आहे.
▪️प्रचाराची पत्रके सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिक कट्टा येथील प्रभागातील नागरिकांना वाटून आणि मतदारांना आवाहन सात में रोजी जास्तीत जास्त मतदान करण्यास यावे, असे सांगण्यात येत आहे.
प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी बाळ माने, शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर, मनसेचे अमोल श्रीनाथ, संदीप गोताड, नूर मोहम्मद सुवर्णदुर्गकर, मुन्ना चवंडे, नगरसेवक उमेश कुळकर्णी, शिवाजी कारेकर, अशोक विलपणकर, श्वेता चवंडे, पप्पी बोरकर, अब्बा कारभारी, सत्यवती बोरकर , अमित विलणकर अभिजीत पेडणेकर, सत्यवती बोरकर, मुकुंद विलणकर, बाबा घुडे, दिलीप नागवेकर गजानन विलनकर प्रकाश नागवेकर शंभू मुंडे, स्वाती विलणकर, नचिकेत पावसकर, आनंद चवंडे ,स्नेहल चवंडे ,प्रेरणा विलणकर ,पिंटू कोतवडेकर व भाजपा शिवसेना मनसे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते..