तुफान राडा… घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन, हातवारे करत नारायण राणेंची धमकी….

Spread the love

राड्यावेळी पोलीस आणि सुरक्षा रक्षकांशी संवाद साधताना नारायण राणेंचा पार चांगलाच चढल्याचं दिसून आलं. नारायण राणे हे एका ज्येष्ठ राजकीय नेत्यावरून थेट कार्यकर्त्यांच्या भूमिकेत पाहायला मिळाले.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीतील नेतेमंडळी आज घटनास्थळी भेट देण्यासाठी राजकोट किल्ल्यावर गेली होती. मात्र, तत्पूर्वीच खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र किल्ल्यावर पोहोचले होते. त्याचवेळी, शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे घटनास्थळी पोहोचले, त्यामुळे राणे समर्थक आणि ठाकरे समर्थक यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली. त्यानंतर, काही वेळातच दोन्ही गटात हमरीतुमरी झाल्याचंही पाहायला मिळालं. विशेष म्हणजे यावेळी खुद्द नारायण राणे यांनी पोलिसांसमोर येऊन काही जणांना इशाराच दिलाय. आमच्या जिल्ह्यात येऊन दमदाटी खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले. त्यावेळी, थेट घरातून खेचून रात्रभर मारीन असा इशाराही नारायण राणेंनी राड्यानंतर दिला.

राड्यावेळी पोलीस (Police) आणि सुरक्षा रक्षकांशी संवाद साधताना नारायण राणेंचा पार चांगलाच चढल्याचं दिसून आलं. नारायण राणे (Narayan Rane) हे एका ज्येष्ठ राजकीय नेत्यावरून थेट कार्यकर्त्यांच्या भूमिकेत पाहायला मिळाले. आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशू राणे म्हणाले, ये कोणीही मध्ये यायंच नाही. त्यानंतर, पोलसांना बोलतना, साहेब, पोलिसांना जेवढं सहकार्य करायचंय ते करा, यापुढे पोलिसांविरुद्ध आमच्या जिल्ह्यात सहकार्य असेल तर, आणि तुम्ही त्यांना येऊ द्या, परवानगी द्या, आमच्या अंगावर घाला, घरात खेचून रात्रभर एकेकाला मारून टाकेन, सोडणार नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घटनास्थळी इशारा दिल्याचे पाहायला मिळाले. तसेच, आम्ही आमच्या भागात आहोत, बाहेरचे येऊन इथं दादागिरी करत असतील, पोलीस त्यांना प्रोटेक्शन देणार असतील तर आम्ही इथून अजिबात हलणार नाही, काही करायचे ते करा, गोळ्या घाला हलणार नाही, असे आंडू पांडू आयुष्यभर पाहिले, आम्ही इथून जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा नारायण राणे यांनी घेतला होता. एकंदरीत शिवरायांच्या (Shivaji Maharaj) पुतळा दुर्घटनेवरुन आता राजकारण तापल्याचं दिसून येत आहे. 

दरम्यान, किल्ल्यावर पोलीस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांकडून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटाला शांत केलं आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही घटनास्थळी पोहोचले होते, त्यांनीही या राड्यावेळी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळातच ते तिथून निघून गेल्याचं पाहायला मिळालं.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page