
रत्नागिरी – रत्नागिरीत सुरू झालेल्या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या श्री भगवान सांबरे मोफत रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी माजी मुख्यमंत्री रत्नागिरी सिंधदुर्गचे खासदार नारायण राणे हेही उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांना शुभेच्छा देताना खा. राणे म्हणाले, खरी सेवा आरोग्याची सेवा रत्नागिरीमधे या रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर होणार आहे. रत्नागिरी आणि आजूबाजूच्या लोकांचे आरोग्यमान वाढवण्यासाठी, चांगल ठेवण्यासाठी एक चांगला आणि स्तुत्य उपक्रम निलेश सांबरे राबवत आहेत.

त्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि हे काम महाराष्ट्रभर होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो. या उद्घाटन कार्यक्रमनिमित्त इथे मोठ्या प्रमाणात जनता जमली आहे, त्यांना भेटाव, त्यांना पाहाव यासाठी इथे आलो. तुम्हाला पाहिले मला खूप आनंद झाला असे खा. राणे म्हणाले. तर लोकहित, लोककल्याण आणि प्रगतीच्या मार्गाने जे जे उपक्रम राबवल त्याच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी उभे राहू असा विश्वासही खा. राणे यांनी त्यांना दिला.